रॉकेट्री : नंबी इफेक्ट ते द काश्मीर फाइल्स; राष्ट्रीय बाण्याच्या सिनेमांवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची मोहोर!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (National Awards 2023) घोषणा आज दिल्लीतून झाली. त्यामध्ये “रॉकेटरी : द नंबी इफेक्ट” ते “द काश्मीर फाइल्स” या राष्ट्रीय बाण्यांच्या चित्रपटांवर पुरस्कारांची मोहर उमटली आहे. लिबरल विचारसरणीच्या नावाखाली नक्षलवाद, इस्लामी दहशतवाद, व्यसनाधीनता वगैरे कुठल्याच गोष्टीचे समर्थन वर उल्लेख केलेले सिनेमे करत नाहीत. उलट त्यावर प्रखर प्रहार करतात. national award 2023 the kashmir files nambi effect

राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी द काश्मीर फाइल्स, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट : RRR, सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म रॉकट्री : द नंबी इफेक्ट, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन : पुष्पा / आरआरआर, सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट : गंगुबाई काठियावाडी, सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर : सरदार उधम सिंह, सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर : सरदार उधम सिंह, सर्वोत्कृष्ट संपादन गंगुबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट छायांकन : सरदार उधम सिंह, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : पल्लवी जोशी द काश्मीर फाइल्स, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : पंकज त्रिपाठी (मिमी), सर्वोत्कृष्ट बालकलाकार : भाविन रबारी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी), क्रिती सॅनन (मिमी), सर्वोत्कृष्ट अभिनेता : अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : निखिल महाजन (गोदावरी – द होली वॉटर)

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : सरदार उधम सिंह, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : एकदा काय झालं, सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट : छेल्लो शो, सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट : 777 चार्ली, सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट : समांतर, सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट : होम याप्रमाणे चित्रपटांना पुरस्कार मिळाले आहेत.

या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये पुष्पा, सरदार उधम सिंह, RRR, द काश्मीर फाइल्स, गंगुबाई काठियावाडी या चित्रपटांचा प्रामुख्याने जलवा हा बघायला मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्ट हिच्यासोबत कंगना राणावत हिला मिळणार असल्याची एक जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगताना दिसली होती.

परंतू सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी कंगना राणावत हिच्याऐवजी मिमी चित्रपटासाठी क्रिती सॅनन हिला पुरस्कार मिळाला आहे. पल्लवी जोशी हिला देखील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

national award 2023 the kashmir files nambi effect

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!