पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात चर्चा, ‘LAC’वरील तणाव कमी करण्यावर एकमत!


नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांनी लडाखमध्ये “त्वरित तणाव कमी करण्यावर” सहमती दर्शवली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की, ब्रिक्समध्ये पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांनी लडाखमधील तणाव  त्वरीत कमी करण्यावर सहमती दर्शवली आहे. Talks between Prime Minister Modi and Xi Jinping consensus on reducing tension on LAC

परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सांगितले की, मोदींनी LACचा मुद्दा चीनच्या राष्ट्राध्यक्षांसमोर मांडला. तणाव लवकर कमी व्हावा यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. हे औपचारिक द्विपक्षीय संभाषण नव्हते, मोदींनी BRICS नेत्यांसोबतच्या त्यांच्या संवादादरम्यान LAC चा मुद्दा उपस्थित केला.

परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले, “…हे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संभाषण होते आणि मी म्हटल्याप्रमाणे, ब्रिक्स परिषदेच्या वेळी पंतप्रधानांनी ब्रिक्सच्या इतर नेत्यांशी संवाद साधला. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या या संभाषणात पंतप्रधान मोदींनी भारत-चीन सीमावर्ती भागातील पश्चिम सेक्टरमधील LAC वर न सुटलेल्या समस्यांवर भारताच्या चिंतेवर प्रकाश टाकला.

जेव्हा पंतप्रधान मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी त्यांना G20 साठी आमंत्रित केले होते का? या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र सचिवांनी उत्तर दिले की, या संभाषणावर मला जे म्हणायचे होते ते मी सांगितले आहे, त्यात आणखी काही भर घालण्यासारखे नाही.

विशेष म्हणजे, मे 2020 मध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात बराच तणाव आहे. परराष्ट्र सचिव म्हणाले की, “ब्रिक्स शिखर परिषदेची मोठी उपलब्धी म्हणजे अर्जेंटिना, इजिप्त, इराण, इथिओपिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या सहा नवीन सदस्यांचा समावेश करण्याचा ब्रिक्स नेत्यांचा सदस्यत्वाचा विस्तार करण्याचा निर्णय आहे.”

Talks between Prime Minister Modi and Xi Jinping consensus on reducing tension on LAC

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात