नरसिंह राव काँग्रेसचे नव्हे, तर भाजपचे पहिले पंतप्रधान; सोनियांच्या उपस्थितीत मणिशंकर अय्यरांचे आरोप बेलगाम!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी आयएफएस अधिकारी मणिशंकर अय्यर आत्तापर्यंत फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांवर घसरायचे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घसरायचे, पण आता त्यांची पातळी आणखी खाली आली असून ते भारताच्या आर्थिक सुधारणांचे जनक माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्यावर देखील घसरले आहेत. नरसिंह राव यांना त्यांनी काँग्रेसचे नव्हे, तर भाजपचे पंतप्रधान ठरविण्याचा डाव केला आहे. सोनिया गांधींच्या उपस्थितीत त्यांनी नरसिंह राव यांच्यावर बेलगाम आरोप केले आहेत. Narasimha rao, not a Congressman but first BJP prime minister, alleged manishankar ayer

मणिशंकर अय्यर यांच्या “द मेमरीज ऑफ द मार्व्हरिक 1941 – 1990” या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. त्या कार्यक्रमात वीर संघवी या ज्येष्ठ पत्रकाराला मुलाखत देताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी आवर्जून उपस्थित होत्या.

या मुलाखतीतच मणिशंकर अय्यर यांनी नरसिंह राव यांच्यावर बेलगाम आरोप केले. त्यासाठी त्यांनी नरसिंह राव यांच्याशी राम रहीम यात्रेच्या वेळी झालेला संवाद श्रोत्यांना सांगितला. राम रहीम यात्रेवर त्यांनी आक्षेप नोंदवला नाही. पण मी त्यांना सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येवर त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी मला सांगितले, की हा देश हिंदूंचा आहे, हे नाकारून चालणार नाही. मी आत्ता खुर्चीवर बसलो असलो, तरी विरोधात असलेल्या भाजपचेही तेच म्हणणे आहे.हे नरसिंह राव यांनी आपल्याला सांगितले होते. त्यांच्याच पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली याकडेही मणिशंकर अय्यर यांनी आवर्जून लक्ष वेधले.

त्याचबरोबर इंदिरा गांधींचे विश्वासू सहकारी आर. के. धवन यांना राजीव गांधी यांनी पंतप्रधान कार्यालयात नियुक्त केले, ही त्यांची चूक होती. कारण त्यांच्यामुळेच पंतप्रधान कार्यालयाचे पूर्णपणे राजकीयीकरण झाले, असा आरोप अय्यर यांनी केला.


इंदिरा गांधी, नरसिंह रावांच्या काळातले केंद्रीय मंत्री अरविंद नेतामांनी काँग्रेस सोडली; छत्तीसगडमध्ये मोठा धक्का!!


मात्र, नरसिंह राव आणि आर. के धवन या दोन काँग्रेसनिष्ठ नेत्यांवर त्यांच्या निधनानंतर आरोप करून मणिशंकर अय्यर यांनी प्रत्यक्षात औचित्य भंग केला. कारण त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आज हे दोन्ही नेते हयात नाहीत.

पण देशातल्या बड्या नेत्यांवर बेलगाम आरोप करण्याची मणिशंकर अय्यर यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी पेट्रोलियम मंत्री असताना अंदमानच्या सेल्युलर जेलमधून सावरकरांच्या काव्यपंक्ती इथल्या स्मारकातून काढून टाकल्या होत्या. त्याबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानातल्या लाहोर मधल्या कार्यक्रमात त्यांनी सावरकरांवर द्विराष्ट्रवादीचा सिद्धांत मांडल्याचा आरोप केला होता. अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “चहावाला” आणि “नीच” अशा शब्दांनी हिणवले होते. आज त्यांनी नरसिंह राव यांना काँग्रेसचे नव्हे, तर भाजपचे पहिले पंतप्रधान म्हणून हिणवले.

पण मणिशंकर अय्यर यांनी हिणवलेले प्रत्येक नेते देशासाठी स्वतःचे विशिष्ट योगदान देणारे नेते ठरले आहेत. सावरकरांच्या हिंदुत्वाचा आज संपूर्ण देशावर निर्णायक पातळीवर प्रभाव आहे. नरसिंह राव यांनी आर्थिक सुधारणांची कवाडे खुली करून देशाला आधुनिक महामार्गावर आणून सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतो आहे आणि या तिन्ही नेत्यांना मणिशंकर अय्यर सारख्या आयएफएस अधिकाऱ्याने हिणवून आपली पातळी किती घसरली आहे, हेच दाखवून दिले आहे.

Narasimha rao, not a Congressman but first BJP prime minister, alleged manishankar ayer

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात