”2024 च्या निवडणुका आहेत आणि पुन्हा…” मणिशंकर अय्यर यांच्या विधानावरून भाजपाचे काँग्रेसवर टीकास्त्र!

BJP spokesperson Sambit Patra appointed as chairman of ITDC

हे शब्द मणिशंकर अय्यर यांचे आहेत, पण विचार गांधी घराण्याचा आहे, असंही म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावरून भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस आणि गांधी परिवारावर निशाणा साधला आहे. BJP criticizes Congress on Mani Shankar Iyers statement

संबित पात्रा यांनी गुरुवारी (२४ ऑगस्ट) सांगितले की, हे शब्द मणिशंकर अय्यर यांचे आहेत, पण विचार गांधी घराण्याचा आहे. मणिशंकर अय्यर हे गांधी घराण्याच्या जवळच्या नेत्यांपैकी एक आहेत. मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या वक्तव्यातून गांधी घराण्याबद्दलची मते व्यक्त केली आहेत. मणिशंकर अय्यर पुन्हा प्रकट झाले आहेत. ते गांधी घराण्यातील सर्वात जवळचे, गांधी घराण्याच्या मुकुटातील रत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय ”हे तेच मणिशंकर अय्यर आहेत, जे गांधी घराण्याचे मुकुटमणी आहेत, ज्यांनी पंतप्रधान मोदींना नीच म्हटले होते. पाकिस्तानमध्ये नरेंद्र मोदी यांच्या पराभवाचे  विधान केले आहे. 2024ची निवडणूक आहे आणि पुन्हा एकदा मुकुटाचा मणी बाहेर पडला आहे. यावेळी त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे.” असंही संबित पात्रा म्हणाले आहेत.

BJP criticizes Congress on Mani Shankar Iyers statement

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!