बलात्कार करणाऱ्यांच्या एन्काऊंटरचे समर्थनही केले आहे
विशेष प्रतिनिधी
कोलाकाता : पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून तृणमूल सरकार विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी महिलांवर अत्याचारर करणाऱ्या गुन्हेगारांच्या एन्काउंटरचे समर्थन केले आहे. बंगालमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी गरज पडल्यास एन्कांउटरच्या मार्गाचा अवलंब करावा, असे ते म्हणाले. तसेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखा माणूसच बंगाल चालवू शकतो, तरच कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवता येईल, असेही ते म्हणाले. West Bengal needs a Person like Yogi Adityanath statement of Suvendu Aadhikari
सुवेंदू अधिकारी हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महिला आणि मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सुवेंदू अधिकारी म्हणाले की, मुलींना अत्याचाराला सामोरे जावे लागते. गरज भासल्यास अशा गुन्हेगारांचे एन्काउंटरही करावे. अशा गुन्हेगारांना जगण्याचा अधिकार नाही. पश्चिम बंगाल हा गुन्हेगारांचा बालेकिल्ला बनत चालला आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासारखी व्यक्तीच या राज्यावर नियंत्रण ठेवू शकते.
सुवेंदू अधिकारी यांच्या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेसचे आमदार तापस रॉय यांनी पलटवार केला आहे. सुवेंदूला बंगालचे कितीही योगीराजात रुपांतर करायचे असले तरी ते कधीच होणार नाही, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App