69 National Award : ‘एकदा काय झालं’, ‘गोदावरी’ चित्रपटांवर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर


विशेष प्रतिनिधी

पुणे : 69 व्या राष्ट्रीय पुरस्काराची गुरुवारी घोषणा करण्यात आली यामध्ये मराठी चित्रपटांनी विशेष बाजी मारली आहे. ‘रॉकेट्री – द नम्बी इफेक्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ हा मराठी सिनेमा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. 69 National Award news

गोदावरी’ या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून तर चंद्रकांत कुलकर्णी निर्मित आणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित ‘चंद सासें’ या शॉर्टफिल्मला सर्वोत्कृष्ट कौटुंबिक सिनेमा हा पुरस्कार घोषित झाला आहे. पुन्हा एकदा मराठी चित्रपटाचं गारुड राष्ट्रीय पुरस्कारावर घातलं गेलं असून, मराठीचा डंका चहुकडे वाजताना दिसत आहे .

‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमासाठी अलिया भट आणि ‘मिमी’ या सिनेमासाठी क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अभिनेत्री आलिया भट हिला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार गंगुबाई काठीयावाडी या सिनेमासाठी तर कीर्ती सेनन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिमी या चित्रपटासाठी मिळाला आहे अल्लू अर्जुन याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पुष्पा या सिनेमासाठी जाहीर झाला आहे . तर पल्लवी जोशी हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री चा पुरस्कार द कश्मीर फाईल या सिनेमासाठी मिळाला आहे.

69 National Award news

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात