नाशिक : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर किंवा न पडल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती दौरे करून एक वर्तुळ आज पूर्ण केले. Sharad pawar and supriya sule avoided welcome processions in baramati, but ajit pawar flexed his mussels
अजित पवारांच्या आजच्या बारामतीच्या दौऱ्यात त्यांचे भव्य स्वागत, सत्कार आणि शक्तिप्रदर्शन झाले. पण काहीच दिवसांपूर्वी स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा दौरा केला, त्यावेळी मात्र त्यांनी कोणतेही मोठे स्वागत समारंभ टाळले. यातली खरी राजकीय विसंगती आज ठळकपणे समोर आली.
इतकेच नाही तर अजित पवारांच्या दौऱ्यातले “बिटवीन द लाईन्स” वाचले, तर बारामतीतले स्थानिक राजकीय रहस्य देखील त्यातून समोर येते.
शरद पवार आठच दिवसांपूर्वी बारामतीत सायंकाळी पोहोचले होते. पवारांचे बाकीच्या सर्व शहरांमध्ये जंगी स्वागत झाले, पण बारामतीत गोविंद बागेत पोहोचेपर्यंत त्यांच्या स्वागताला कोणीही हजर नव्हते, अशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या.
त्यानंतर दुसऱ्या दौऱ्यात पवारांनी परवाच म्हणजे 24 ऑगस्टला बारामतीत पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवारांना “आपले” म्हटले, पण त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये साताऱ्यात जाऊन आपण तसे बोललोच नव्हतो, असा कानावर हात ठेवला. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते आहेत, असे म्हटले असले तरी त्यांचे नाते बहीण भावंडांचे आहे. त्याचे राजकीय अर्थ काढू नका, असे पवारांनी साताऱ्यातल्या दहिवडीत पत्रकारांना सुनावले. त्यानंतर पवारांनी कोल्हापूर दौरा केला तेथे पवारांनी अजित पवारांचे नाव अजिबात घेतले नाही.
सुप्रिया सुळे यांनी 18 ऑगस्टला बारामतीचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी एका कलादालनाला भेट दिली. मात्र त्यांच्या स्वागताचा कोणताही समारंभ झाला नाही.
याच्या बरोबर उलट आज 26 ऑगस्ट रोजी अजित पवारांचा बारामती दौरा झाला. त्यावेळी त्यांचे प्रचंड स्वागत झाले. कार्यकर्त्यांनी जेसीबीतून त्यांच्यावर फुले उधळली. शारदा मैदानावर त्यांचा जाहीर सत्कार झाला. अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
बारामतीच्या स्थानिक राजकारणात पुतण्याच दादा!!
यातून एक बाब अधोरेखित झाली, ती म्हणजे बारामतीची मूळ राजकीय बांधणी जरी शरद पवारांनी केली असली, तरी त्यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी म्हणून बारामतीकरांनी अजित पवारांनाच स्वीकारले आहे. बारामतीत भाजपने सेंधमारी केली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे तिथले शक्तिप्रदर्शन ठळकपणे उठून दिसले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय पक्ष म्हणून फूट पडली असली, तरी आपल्या कुटुंबात फूट पडली नाही हे दाखविण्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा आटापिटा सुरू आहे. पण हा आटापिटा करण्याचे खरे कारण बारामतीच्या स्थानिक राजकारणात दडले आहे, ते म्हणजे एकतर पवारांनी तिथे स्थापन केलेल्या संस्थांमध्ये मोठी कौटुंबिक गुंतागुंत आहे. त्याचबरोबर अजित पवारांची स्थानिक ताकद सुप्रिया सुळे यांच्या पेक्षा कितीतरी जड आहे.
सुप्रिया सुळे यांना कोणत्याही निवडणूक निवडून यायचे असेल, तर अजित पवारांशी थेट पंगा घेऊन त्यांना बिलकुल चालणार नाही.
शरद पवारांच्या बळावर त्या तीन टर्म खासदार असल्या, तरी अजित पवारांनी ज्या पद्धतीने स्थानिक पातळीवर स्वतःची म्हणून राजकीय बांधणी केली आहे, तशी बांधणी सुप्रिया सुळे यांना करता आली आहे याची कुठलीच चिन्हे बारामतीत दिसत नाहीत. शरद पवारांच्या कन्या या सावलीतच आजही त्यांची राजकीय कारकीर्द सुरू आहे.
त्या उलट अजित पवार हे पवारांच्या “त्या” सावलीतून केव्हाच बाहेर पडले. ते पवारांचे पुतणे असले तरी संघटनात्मक बांधणी करण्यात ते सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा कितीतरी पुढे आहेत. हे त्यांनी आपल्याबरोबर राष्ट्रवादीतल्या आमदारांची जास्त संख्या खेचून घेऊन सिद्ध केले आहे. त्याचबरोबर आपण महाराष्ट्रातच राजकारण करायचे आहे हा त्यांचा फोकस पक्का असल्याने संघटनात्मक पातळीवरची त्यांची बांधणी सुप्रिया सुळे यांच्या पेक्षा जास्त पक्की आहे.
त्यामुळेच अजित पवारांचे आजचे बारामतीतील शक्ती प्रदर्शन ठळकपणे उठून दिसलेच पण त्याचबरोबर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बारामती दौऱ्यात कार्यकर्ते का जमले नव्हते??, त्याचे राजकीय इंगितही समोर आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App