विशेष प्रतिनिधी
नूह : हरियाणातील नूह जिल्ह्यात प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्यानंतरही विश्व हिंदू परिषदेने (विहिप) 28 ऑगस्टला पुन्हा ब्रिज मंडळ यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हरियाणा सरकारच्या गृहसचिवांनी 28 ऑगस्टपर्यंत राज्यातील या ठिकाणी पुन्हा इंटरनेट सेवेवर बंदी घातली आहे. Internet service shut down in Haryanas Nuh VHP announces Brajmandal Yatra again
सरकारने हरियाणातील नूह जिल्ह्यात पुन्हा एकदा इंटरनेट सेवा बंद केली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने असा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. विश्व हिंदू परिषदेने 28 ऑगस्टला पुन्हा ब्रजमंडल यात्रा काढण्याची घोषणा केली होती. मात्र प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. असे असतानाही विहिंप ब्रजमंडल यात्रा काढण्यासाठी आग्रही आहे.
हे पाहता शुक्रवार, 25 ऑगस्ट रोजी नूहच्या उपायुक्तांनी गृह विभागाला पत्र लिहून नूहमधील इंटरनेट सेवा आणि बल्क मेसेज बंद करण्याची शिफारस केली होती. यानंतर आज, शनिवार 26 ऑगस्ट रोजी हरियाणाच्या गृहसचिवांनी 26 ते 28 ऑगस्टपर्यंत नूहमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. नूह प्रशासनाने विश्व हिंदू परिषदेला ब्रजमंडल यात्रा पुढे ढकलण्यास सांगितले होते. मात्र प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत हिंदू संघटना पुन्हा शोभा यात्रा काढणार असल्याची चर्चा आहे.
यासोबतच प्रशासनाच्या आवाहनावरून मुस्लिम समाजातील लोकांनी मशिदींऐवजी घरीच शुक्रवारची नमाज अदा केली. कलम 144 चा हवाला देत प्रशासनाने शुक्रवारची नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच जिल्ह्यात शांतता राखण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. येथे प्रशासनाकडून जिल्ह्यात आरएएफ आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच जिल्ह्यात पोलिसांकडून फ्लॅग मार्चही काढण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App