बीडच्या सभेत छगन भुजबळ फुटले; शरद पवारांवर धुवाँधार बरसले!!


प्रतिनिधी

बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामतीच्या सभेत शरद पवारांचे नाव न घेता त्यांना 54 वर्षांच्या बारामतीच्या राजकारणातून “डी ब्रँड” केले असले तरी, बीडच्या आजच्या सभेत मात्र त्यांच्या नेतृत्वाखालचे नेते राज्याचे मंत्री छगन भुजबळ फुटले आणि शरद पवारांवर धुवाँधार बरसले!! पवारांचे 1991 पासूनचे सगळे वाभाडे त्यांनी काढले. chhagan bhujbal speech in beed sabha

शरद पवारांनी भुजबळांना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून फोडून काँग्रेसमध्ये घेतले. त्यांना उपमुख्यमंत्री केले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांना पहिले प्रदेशाध्यक्ष केले, पण तेलगी घोटाळ्यात त्यांचा राजीनामा घेतला या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी पवारांचे वाभाडे काढले.

छगन भुजबळ म्हणाले, की अब्दुल करीम तेलगीला मी स्टॅम्प घोटाळ्यात अटक केली. पण तरीदेखील पवारांनी अचानक मला बोलवून माझा राजीनामा घेतला. त्यावेळी प्रफुल्ल पटेल जवळ बसले होते. झी न्यूज कंपनीच्या सुभाष गोयल यांनी फोन केला होता. पण त्यांचे देखील पवारांनी ऐकले नाही. माझा राजीनामा घेतला. सीबीआयच्या चार्जशीट मध्ये माझे नाव देखील नव्हते तरी देखील पवारांनी माझे ऐकले नाही.

वास्तविक खुद्द पवारांवर देखील त्यावेळी भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. सदाशिवराव तिनईकरांपासून ते खैरनारांपर्यंत अनेकांनी पवारांवर आरोप केले. पण स्वतः पवारांनी कधी राजीनामा दिला नाही. माझा मात्र राजीनामा घेतला हा माझ्यावर अन्याय होता.

महाराष्ट्राच्या सत्तेची वाट देखील स्वतः पवारांनीच अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांना दाखवली आणि आज ते स्वतःच फिरले. आमच्याविरुद्ध आमच्याच मतदारसंघातून काहीबाही बोलू लागले. ते अजित पवारांविरुद्ध बोलत नाहीत पण आमच्या सारख्या सहकार्यांविरुद्ध बोलतात. येवल्यात येऊन त्यांनी मतदारांची माफी मागितली. पण पवार साहेब तुम्ही माफी तरी किती जणांचे मागणार 54 आमदारांच्या मतदारसंघात जाऊन तुम्हाला माफी मागावी लागेल, असा टोला भुजबळ यांनी शरद पवारांना लगावला.

अजित पवारांनी शरद पवारांचे नाव बारामती टाळले, तरी बीडमध्ये मात्र अजित पवारांच्या सहकाऱ्यांनी पवारांचे नाव घेऊन त्यांचे पुरते राजकीय वाभाडे काढले.

chhagan bhujbal speech in beed sabha

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात