अदानी हमाम में तो सारे ही नंगे है, पवारांवर बोलायला घाबरत नाही; तृणमूळ काँग्रेस खासदार महुआ मोईत्रांचा तिखट हल्लाबोल


प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अदानी मुद्द्यावर देशभर अक्षरशः रान पेटवले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मात्र उघडपणे अदानींची बाजू घेतली आणि आजच सिल्वर ओक वर अदानींची भेट घेऊन 2 तास चर्चा केली. या पवार – अदानी भेटीमुळे देशातले राजकीय तापमान पुन्हा एकदा वाढले असून तृणमूळ काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी अत्यंत तिखट शब्दांमध्ये शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. MC MP mahua moitra’s very sharp political attack on sharad Pawar – adani meeting

पवार – अदानी भेटीनंतर महुआ मोईत्रा यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटची सुरुवातच, “अदानी हमाम मे सब नंगे है, या तिखट शब्दांनी केली आहे. या ट्विटमध्ये महुआ मोईत्रा म्हणतात, “अदानी हमाम मे सारे ही नंगे है. मी महान मराठा नेता शरद पवारांविषयी बोलायला घाबरत नाही. त्यांनी आपले स्वतःचे जुने संबंध टिकवण्यापेक्षा देशहिताला प्राधान्य द्यायला पाहिजे होते. माझे हे ट्विट विरोधकांच्या ऐक्याविरुद्ध अजिबात नाही, तर ते जनतेच्या हिताचे आहे,” अशा स्पष्ट शब्दांमध्ये महुआ मोईत्रांनी शरद पवारांना ठणकावले आहे!!

अदानींच्या शेल कंपनीत 20000 कोटी रुपये आले कुठून?, हा सवाल राहुल गांधींनी वारंवार विचारला आहे. मात्र त्या मुद्द्यावर मोदी सरकारने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. अदानी उद्योग समूहाने मात्र त्यावर 24000 कोटी रुपयांचा हिशेब सार्वजनिक केला आहे, तरी देखील राहुल गांधींनी आपला मुद्दा सोडलेला नाही.

दरम्यानच्या काळात शरद पवारांनी एनडीटीव्हीला मुलाखत देऊन अदानींची बाजू उचलून धरत राहुल गांधींचे कान टोचले होते, तरी देखील राहुल गांधी बधले नाहीत. उलट ते अधिक आक्रमक झाले आणि कर्नाटकातल्या सभांमध्ये त्यांनी अदानी मुद्द्यावर मोदी सरकारवर जोरदार हल्ले करीत राहिले.

या पार्श्वभूमीवर आज गौतम अदानींनी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी सिल्वर ओक गाठून शरद पवारांची सुमारे 2 तास चर्चा बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेतले कुठलेही तपशील बाहेर आले नाहीत.

उद्धव ठाकरेंची स्वतंत्र पत्रकार परिषद

पण त्या मुद्द्यावरून मात्र विरोधी पक्षांमध्ये राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील अदानी आणि देशातला भ्रष्टाचार या मुद्द्यावर स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन बोलणार असल्याचे जाहीर केले आहे, तर त्या पलीकडे जाऊन तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी, “अदानी हमाम मे तो सारे ही नंगे है”, अशा तिखट शब्दांमध्ये पवारांवर वार केला आहे.

ममता – पवार उत्तम संबंध पण…

एरवी शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांचे संबंध सौहार्दाचे आहेत. ममता बॅनर्जी यांनी देखील काहीच महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात येऊन सिल्वर शरद पवारांची भेट घेऊन विरोधी ऐक्याच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकले होते. पण आता त्यांच्याच तृणमूळ काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रांनी, “अदानी हमाम में तो सारे ही नंगे है आणि मी महान मराठा नेता शरद पवारांविरुद्ध बोलायला घाबरत नाही,” असे ट्विट केल्याने विरोधी ऐक्यालाच सुरुंग लागला आहे आणि तृणमूळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय संघर्षही उभा राहिला आहे. या मुद्द्यावरचा राष्ट्रवादी कडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MC MP mahua moitra’s very sharp political attack on sharad Pawar – adani meeting

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात