राष्ट्रवादीतील फूट : पवारांच्या इंग्रजी आत्मचरित्राचे टायटल आहे, “ऑन माय टर्म्स”; पण मोदी – शाह कधी इतरांच्या टर्म्सवर राजकारण करतात??


विनायक ढेरे

अजित पवारांच्या तथाकथित बंडखोरीवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या आठवडाभरात बातम्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीला या बातम्या “एन्जॉय” केल्यानंतर खुद्द शरद पवार, अजितदादा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांचे बंड वगैरे काही नसल्याचा खुलासा केला, पण तरीही अजितदादांच्या कथित बंडाच्या बातम्या थांबल्या नाहीत. शिवसेना – भाजपच्याच काय, पण राष्ट्रवादीच्या आमदारांनीही त्या बातम्यांना खतपाणी घातले आणि त्या बातम्या दस्तूरखुद्द शरद पवार, अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांच्या स्पष्टीकरणानंतरही महाराष्ट्राच्या राजकीय हवेत उडत राहिल्या. Sharad Pawar style of politics is on his terms, but does Modi – Shah BJP follow any other’s term and conditions??

अजितदादा राष्ट्रवादीच्या 40 आमदारांना घेऊन बाहेर पडणार, एकनाथ शिंदेंना बाजूला सारून ते मुख्यमंत्री होणार, अशा बातम्यांच्या वावड्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांनी आधारे उडविल्या खऱ्या, पण त्याचवेळी त्यांनी सुप्रीम कोर्टातल्या शिंदे विरुद्ध ठाकरे केस कडे त्यांची पूर्ण डोळेझाक केली. जणू काही एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे 40 आमदार फोडणे हे घटनाबाह्य, पण अजितदादांनी राष्ट्रवादीचे 40 आमदार फोडणे हे घटनादत्त किंवा घटनेअंतर्गतच असलेले राजकीय कार्य आहे, असे माध्यमांनी मानले होते. एकूण पवारांना अनुकूल नॅरेटिव्ह माध्यमांनी चालवून घेतला.

पण या बातम्यांमधले “बिटवीन द लाईन्स” किंवा “बियाँड द लाईन्स” वाचले, तर सहज शरद पवारांच्या आत्मचरित्राकडे लक्ष गेले. शरद पवारांच्या मराठी आत्मचरित्राचे शीर्षक आहे, “लोक माझे सांगाती”, पण त्याच्या इंग्रजी अनुवादाचे शीर्षक अजिबात तसे नाही, तर त्या इंग्रजी अनुवादाचे शीर्षक आहे, “ऑन माय टर्म्स”!!

याचा अर्थ शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्राच्या शीर्षकातच हे सांगून टाकले आहे, की आपण जे काही राजकारण – समाजकारण करतो, ते आपल्या स्वतःच्या टर्म्स आणि कंडिशन्सवर असते… आणि इथेच नेमकी त्यांच्या भाजपशी उघड अथवा छुप्या राजकीय संबंधांची खटकी पडते!!

पवार – काँग्रेस संबंध

पवारांनी भले काँग्रेस नेत्यांशी काही काळ स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर राजकारण केले असेल, पण या टर्म एंड कंडिशन्स प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच्या आहेत, हे विसरता येणार नाही. 1978 ते 80 पवारांनी स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर पण जनता पार्टीच्या कन्सेंटने महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा गाडा हाकला होता. 1986 मध्ये ते काँग्रेसच्या आणि स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर काँग्रेसमध्ये गेले आणि नंतर ते मुख्यमंत्री बनले, पण या टर्म्स अँड कंडिशन्स फक्त पवारांच्या उरल्या नव्हत्या, तर त्या राजीव गांधींच्या काँग्रेसच्याही होत्या!!

नरसिंहरावांच्या टर्म्स अँड कंडिशन्स

1991 ते 95 या कालावधीत, तर नरसिंह राव यांच्याकडे काँग्रेसची आणि केंद्र सरकारची सूत्रे असताना पवारांच्या टर्म्स अँड कंडिशन्स राजकीयदृष्ट्या कुठे अप्लायच झाल्याचा अनुभव नाही. उलट नरसिंह राव यांनी चाणक्यगिरीने 1992 च्या मुंबई दंगली नंतर शरद पवारांना मुंबईला मुख्यमंत्री म्हणून पाठवले होते. त्यावेळी पवारांची कोणतीही टर्म अँड कंडिशन नरसिंह रावांपुढे चालली नव्हती!! पण हा झाला पवारांच्या काँग्रेसमधल्या टर्म्स अँड कंडिशन्सचा इतिहास.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवारांनी स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्स वर केली हे खरे, पण नंतर काँग्रेसची तडजोड करूनच त्यांना महाराष्ट्रातल्या सत्तेचा वाटा मिळवावा लागला. हा 15 वर्षांचा अनुभव होता. त्यात काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाची टर्म अँड कंडिशन पवारांना मान्य करावी लागली होती.

भाजपच्या दोन पिढ्यांशी संबंध

या सर्व कालावधीत पवारांचे भाजपच्या दोन पिढ्यांच्या नेत्यांशी संबंध आले, वाजपेयी – अडवाणी आणि नंतर मोदी – शाह पण या दोन पिढ्यांशी. पण पवारांनी फक्त आणि फक्त स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर हे संबंध ठेवल्याचे उदाहरण दिसत नाही. उलट शरद पवारांना अटल बिहारी वाजपेयी यांनी तडजोडीच्या टर्म्स अंड कंडीशन वर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष नेमले होते. पण या टर्म्स अँड कंडिशन्स तुलनेने पवारांसाठी अनुकूल होत्या.

– मोदी – शाहांबरोबरचे संबंध

पण आता जेव्हा भाजपमध्ये मोदी – शाह या जोडगळीचे राज्य आहे, तेव्हा पवारांना अर्थातच विशिष्ट मान जरूर आहे, पण मोदी आणि शाह हे इतर कोणाच्या टर्म्स अँड कंडिशन्स नुसार राजकारण करतात का?? असा गेल्या 9 वर्षांमधला अनुभव आहे का??, हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे… या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर मोदी शाहांच्या राजवटीत पवारांच्या टर्म्स अँड कंडिशन्सची नेमकी अवस्था काय होईल??, ते लक्षात येईल.

मोदी आणि शाह हे फक्त आणि फक्त स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर राजकारण करतात, हाच तर विरोधकांचा मुख्य आरोप आहे आणि तो आरोप पवारांनाही मान्य आहे. पण तरी देखील पवारांचे मोदी आणि शाहांशी वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध आहेत… पण म्हणून महाराष्ट्रात मोदी आणि शाह हे स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर राजकारण करण्याचा नियम बाजूला ठेवून पवारांच्या टर्म्स अँड कंडिशन्स स्वीकारून राजकारण करतील??, या विषयी खोलवर शंका आहे. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना बाजूला ठेवा. गडकरींना मुख्यमंत्री करा. राष्ट्रवादीचा पाठिंबा देतो ही पवारांची टर्म अँड कंडिशन मोदी – शाह यांनी धुडकावली होती, हे विसरून चालणार नाही!!

2019 मध्ये पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवून स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर महाराष्ट्राचा राज्य कारभार जरूर हाकला, पण तो फक्त अडीच वर्षांपूरता. तसा कारभार पवार हे मोदी – शहांच्या भाजपशी डील करून महाराष्ट्रात हाकू शकतील का??, हा प्रश्न आहे.

कारण मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरेंना बसवून शिवसेनेला राजकीय दृष्ट्या गंडवणे निराळे आणि मोदी – शाहांच्या भाजपबरोबर राजकीय डील करून स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन पुढे रेटणे वेगळे!! मोदी – शाह पवारांच्या टर्म्स अँड कंडिशन्स ऐकून घेतील का?? आणि पवारांना देखील ते जमेल का?? हा मूलभूत प्रश्न आहे!!

मोदी – शहांच्या भाजपशी डील करणे ही सोपी गोष्ट नाही. मोदी – शाह यांचे राजकारण इतके “श्रूड” आहे, की ते भल्याभल्यांना सहज संपवून टाकतात, हे गुजरात आणि कर्नाटकच्या उदाहरणावरून उघडपणे दिसले आहे. माजी मुख्यमंत्र्यांची तिकिटे कापणे ही बाकीच्या कोणत्याही पक्षांना अवघड असलेली कामगिरी मोदी – शाहांनी चुटकीसरशी केली आहे. इतकेच नाही तर जिथे भाजपने सत्तेचा सूर्य कधीही पाहिला नव्हता, तिथे मोदी – शाहांनी भाजपच्या स्वबळावर तो सत्तेचा सूर्य उगवून दाखवला आहे. त्यामुळे मोदी – शाहांचे राजकारण हे स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्स वर चालते, पवारांसारख्या प्रादेशिक नेत्याच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर नव्हे, ही वस्तुस्थिती आहे!!

मग ही वस्तुस्थिती मान्य करून आणि महाराष्ट्रात फडणवीसांसारखा मुरब्बी नेता स्वीकारून पवारांसारखा प्रादेशिक नेता स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर कितपत टिकून राहू शकेल??, हा खरा प्रश्न आहे. “ऑन माय टर्म्स” हे आत्मचरित्राला टायटल देणे वेगळे आणि मोदी – शहांच्या भाजपशी त्याच टर्म्सवर डील करण्याची क्षमता राखणे वेगळे. हे दोन्ही भिन्न मुद्दे आहेत आणि ते पवारांना परवडण्यापलिकडचे आहेत!!

इथेच मोदी – शाहांचा भाजप आणि पवार यांच्यात युती किंवा आघाडी कितपत होईल आणि ती कितपत यशस्वी ठरेल??, या विषयी रास्त शंका येते!!

Sharad Pawar style of politics is on his terms, but does Modi – Shah BJP follow any other’s term and conditions??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात