प्रतिनिधी
अकोला : अकोला जिल्हा परिषद मेहेरबान, अंजली प्रकाश आंबेडकरांना 155 एकर शेती 3.70 लाखात भाड्याने “कुर्बान”!!, असे घडले आहे.Akola Zilla Parishad Meherban; Anjali Prakash Ambedkar 155 acre farm at 3.70 lakh rent “Kurban”!!
जिल्हा परिषदेची तब्बल 155 एकर शेती सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली प्रकाश मायदेव (आंबेडकर) यांना माहितीसाठी म्हणजे कसण्यासाठी भाडे तत्वावर केवळ 3 लाख 70 हजारात दिल्याचा प्रकार उजेडात आला आहे. तो देखील नियमांत “बसवून”!!
करारानुसार त्यांच्याकडे ही जमीन वाहितीसाठी 31 मार्च 2024 पर्यंत राहणार आहे. सरकारी दरानुसार ही जमीन 18 लाख 49 हजार 100 रुपयांत भाड्याने देणे अपेक्षित होते. पण यापूर्वी झालेल्या लिलाव प्रक्रियेतून सर्वाधिक 9 लाख 80 हजार 500 बोली लागली होती; परंतु ही रक्कम सरकारी दरापेक्षा कमी असल्याने पुन्हा लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र पुन्हा राबवलेल्या प्रक्रियेत तर यापूर्वी पेक्षाही कमी रकमेची बोली लागल्याचे दिसून आले. शेवटच्या प्रकियेत बंद लिफाफ्यातून निविदा मागवण्यात आल्या. ही प्रक्रिया राबवण्याचे अधिकार सर्वसाधारण सभेने थेट जिल्हा परिषद अध्यक्षांनाच दिले होते. मात्र याबाबत अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलणे टाळले. दिव्य मराठी वेब पोर्टलने ही बातमी दिली आहे.
बाळापूर तालुक्यातील हाता परिसरात असलेली 155 एकर शेत जमीन एका वर्षसााठी भाडे पट्टावर लिलावाद्वारे वाहितीसाठी देण्यात येते. यातून जिल्हा परिषदेला उत्पन्नही मिळते. सन 2023 – 24 साठी शेत जमिनीचा लिलाव करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तीन वेळा राबविली. यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरातही दिली होती.
काय म्हणतात लोकप्रतिनिधी, अधिकारी?
शेत जमीन भाड्याने देण्याची प्रक्रिया नियमानुसार पार पाडण्यात आली. प्राप्त निविदांमधून सर्वात जास्त रक्कम असलेली निविदा मंजूर झाली. झुकते माप देण्याचा प्रश्नच नाही. आम्ही जिल्हा परिषदेच्या हिताचाच निर्णय घेत आहोत व भविष्यातही लोकहिताचेच निर्णय घेऊ.
ज्ञानेश्वर सुलताने, गट नेते, वंचित बहुजन आघाडी.
प्रथम निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर सरकारी दरापेक्षा कमी रक्कम प्राप्त होणार असल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्याचा अधिकार सर्वसाधारण सभेने अध्यक्षांना बहाल केला. त्यानुसार अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थित ही प्रक्रिया राबवण्यात आली. बंद लिफाफ्यातून तीन निविदा प्राप्त झाल्या. सर्वात जास्त रक्कम असलेली निविदा मंजूर करण्यात आली. सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पडली आहे.
महेंद्र साळके, प्रभारी जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद अकोला.
असे आहेत सरकारचे दर
गटनिहाय सरकार दर पुढीलप्रमाणे आहेत. गट क्र. 240 (पूर्व) ₹5,60200, पश्चिम – ₹3,16200, गट क्र. 567 – ₹6,41700 आणि गट क्र. 756 – ₹3,31000 अपेक्षित आहे.
कोण आहेत प्रा. अंजली प्रकाश आंबेडकर??
एडवोकेट बाळासाहेब ऊर्फ प्रकाश म्हणजे ‘राज्यघटना’कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू. भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष. ‘अकोला पॅटर्न’चे जनक. त्यांच्या पत्नी प्रा. अंजली मायदेव आंबेडकर नोकरीसाठी पुण्यात असतात. पण निवडणुका लागल्या की मोठी सुटी घेऊन अकोल्यात येतात.
1993 मध्ये त्यांचा बाळासाहेबांशी विवाह झाला. मी 1996 पासून त्या निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या. पुण्यात राहात असल्या तरी तरी त्यांची दरमहा अकोल्याला चक्कर होतेच. पक्षाच्या महिला आघाडीची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आहे. सर्व निवडणुकांमध्ये त्या आघाडीवर राहून प्रचार करतात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App