प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कटकारस्थान करून नियोजनबद्ध दंगली घडवणाऱ्या गुंड समाजकंटकांना जन्माचा धडा शिकवण्याचा इशारा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर अकोला आणि शेवगाव पोलिसांनी धडक कारवाई करत 200 दंगलखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय फौजदारी कायद्याची अशी कलमे लावली आहेत, की ज्यातून त्यांची 7 ते 10 वर्षे सुटका होणे कठीण आहे. इतकेच नाही तर, त्या पाठोपाठ दंगलीच्या सूत्रधारांच्या मालमत्तांचे मार्किंग करून महाराष्ट्रातही “बुलडोजर बाबा” चालविण्याची तयारी सुरू झाली आहे. गृहमंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे. अजूनही कोंबिंग ऑपरेशन चालू आहे.Akola – Shevgaon of Law ; 200 rioters were by the police
राज्यात जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याऱ्या म्होरक्यांना इथ माफी नाही. 200 + च्या वर दंगलखोराना पोलिसांनी अटक केली आहे. या दंगलखोरांवर पोलिसांनी जी सेक्शन लावले आहेत ते त्यांच्या हजेरी पटावरील नंबर नाहीत. IPC सेक्शन – 147 ,148 ,149, 302, 324, 337 आणि 338. इतर चार जणांवर Arm’s Act 135, 504 ,506 हे सेक्शन लावले आहेत. या सेक्शन मध्ये आरोपींना शिक्षा जन्मठेप, 5 वर्षे 7 वर्षे एवढा तुरुंगवास होतो.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार असताना निरपराध हिंदूंवर गुन्हे दाखल होत होते. हिंदूंची दुकाने फोडली जात होती. पण, त्यावेळी दंगल पोरांवर एवढ्या कठोर कलमांतर्गत कारवाई झाली नव्हती.
उमेश कोल्हे हत्याकांडातील सूत्रधार आणि आरोपींना सरकार बदलताच गजाआड करण्यात आले. ठाकरे – पवार सरकार बदलले नसते तर आज हणत्याकांड घडवणारे आरोपी मोकाट राहिले असते.
शिंदे – फडणवीस सरकार नक्षलवाद्यांवर ज्या कठोर पद्धतीने कायद्याचा बडगा चालविला आहे, तोच कायद्याचा कठोर बडगा दंगलखोराविरुद्ध चालविला आहे. अकोल्यात दंगलखोर ज्या वस्तीत राहत होते, त्या वस्तीत आता कायद्याच्या कठोर कारवाईने भीतीयुक्त शांतता आहे. कारण दंगलखोरांना पोलिसांनी तिथूनच उचलून कोठडीत टाकले आहे. अकोला दंगलीतील मधील मुख्य सुत्रधाराच्याही पोलिसांनी मुसक्या अवळल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App