एकीकडे पवार गटाने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा गदारोळ सुरू केला असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्हा वार्षिक आराखड्याच्या बैठकीत सहभागी झाल्या.
कुठल्याही पवारांनीच सत्ता भोगायची, पण इतरांवर फोडायचे खापर; दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी ही तर मोठी तडफड!!, हेच राजकीय वास्तव आज सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या वक्तव्यांमधून समोर आले.
रोहित पवार हे नवे राहुल गांधी बनलेत की ते संजय राऊत इन मेकिंग बनत चाललेत??, असा सवाल विचारायची वेळ त्यांच्याच गेल्या तीन दिवसांमधल्या वक्तव्यांमधून पुढे आली.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपला पक्ष भविष्यातही केंद्रातील सत्ताधारी NDA सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर तटकरेंनी ही भूमिका विषद केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या कथित विलीनीकरणाचा मुद्दा तूर्त लोंबकळल्याचा दावा केला
बनावट स्टॅम्प घोटाळ्याचे तेलगीप्रकरण चांगलेच गाजले होते. या तेलगी प्रकरणानंतर सरकारी दस्ताऐवज वापरण्यात येणाऱ्या स्टॅम्पमध्ये काही सुधारणा देखील करण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही स्टॅम्पचा घोटाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. नकली पोस्टल स्टॅम्प बनवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यातील आरोपींना पोलिसांनी बिहार आणि दिल्लीमधून अटक केली आहे. तसेच आरोपींकडून लाखोंचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे सत्य निश्चितच बाहेर येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना त्यांच्याकडील पुरावे तपास यंत्रणांना देण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात 10 फेब्रुवारीपासून बारावीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात झाली असली तरी, पहिल्याच दिवशी ‘कॉपीमुक्त’ अभियानाचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. काही परीक्षा केंद्रांवर खुद्द अधिकारी आणि पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना चक्क कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचे तसेच दोषी पर्यवेक्षक आणि केंद्र अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्याच्या जमीन महसूल कायद्यात मोठा बदल केला आहे. त्यानुसार, आता शेतकऱ्यांना बिगर कृषी (एनए) वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची कोणतीही गरज नाही.आता बांधकाम आराखडा मंजुरीलाच एनए मानले जाणार आहे. सरकाच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने 150 दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम राबविण्यात आला.
शरद पवार गटाचा विलीनीकरणासाठी धडपडाट; पण सुनेत्रा पवारांच्या दिल्ली भेटीनंतरही सुनील तटकरे यांची विलीनीकरणाला टांग!!, अशीच राजकीय घडामोडी आज राजधानीतून समोर आली.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार दि. 23 फेब्रुवारी 2026 ते बुधवार दि. 25 मार्च 2026 पर्यत निश्चित करण्यात आले आहे. दिनांक 6 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीलाच मोठ्या गाठीभेटी घेतल्या. त्याचवेळी रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन पत्रकार परिषद घेतली. त्यानिमित्ताने पवार कुटुंबाची “डबल गेमच” राजधानीतून समोर आली.
अंमलबजावणी संचालनालय (ED) लवकरच रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांना नवीन समन्स जारी करेल. अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की, मनी लॉन्ड्रिंगच्या एका प्रकरणात चौकशीसाठी त्यांना पुन्हा बोलावले जाईल.
संवेदनशील माणूस घडविण्याच्या प्रक्रियेत शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणातूनच गुणवत्तावान समाज निर्माण होतो आणि असा प्रगल्भ समाजच राष्ट्राला बलशाली बनवतो. त्यामुळे शिक्षकांनी केवळ उपजीविका म्हणून नव्हे, तर आत्मीयतेने या पवित्र कार्यात झोकून दिले पाहिजे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
अजितदादांच्या स्मारक संग्रहालयावरून त्यांच्या दोन मुलांमध्ये वाद, की वादाच्या निमित्ताने दोन शहरांमध्ये दोन संग्रहालये बांधायचा घाट??, असा सवाल समोर आलाय.
राष्ट्रवादीच्या विलीनकरण संदर्भात त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्याविषयी माझा बोलण्याचा काहीही संबंध नाही. त्यांचा पक्षांतर्गत निर्णय झाल्यानंतर ते महायुतीकडे तसा प्रस्ताव घेऊन येतील. त्यानंतर मात्र, नक्कीच याविषयी बोलणे योग्य ठरेल. मात्र, तोपर्यंत हवेत पतंगबाजी का करायची? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांना मंगळवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या एका व्हॉइस नोटद्वारे देण्यात आली आहे, यात आरोपीने कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.
अजित पवारांच्या विमान घातपाताबाबत लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडले आहेत. अजित दादांचा मृत्यू झाला यावर विश्वास बसत नव्हता. मात्र ही घटना सत्य आहे. आज अजितदादा आपल्यामध्ये नसले तरीसुद्धा विचाराने ते कायम आपल्या सोबत आहेत, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या अपघाताबतचे सविस्तर प्रेसेंटेशन रोहित पवार यांनी सादर केले.
महाराष्ट्रातल्या विविध कार्यालयांमध्ये प्रशासकीय सुधारणा व्हाव्यात. या सुधारणांचा जनतेला लाभ व्हावा या हेतूने फडणवीस सरकारने वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये विविध उपक्रमांची स्पर्धा घेतली. या उपक्रमांच्या स्पर्धेचा निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर द्वारे जाहीर केला.
“धर्माचा मार्ग सोडून भौतिकतेचा स्वीकार केलेल्या जगाला सुविधा मिळाल्या, मात्र सुख दुरावले आहे. यामुळेच आज मानवासमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन ज्ञान यांचा समन्वय साधून धर्माच्या आचरणातूनच मानवजातीचे खरे कल्याण होईल,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला पहिल्यांदाच उपस्थित राहिल्या.
मणिपूरमधील उखरुल जिल्ह्यातील व्यावसायिक शहर लितानमध्ये तणाव कायम आहे. तरीही, मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांच्या तैनातीमुळे सध्या परिस्थिती शांत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तांगखुल नागा आणि कुकी समुदायांमधील हिंसक संघर्षांनंतर लितान आणि त्याला लागून असलेल्या मंगकोट गावातून मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर सुरू आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालात शिंदे सेनेला मागे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आल्याचा भास, पण हा तर वस्तुस्थितीचा विपर्यास!!,
जितके अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल कुणी संशय आणि संदेह पसरवेल तितके दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण दूरच जाईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेसाठी यंदा १५ लाख ३२ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान राज्यातील ३ हजार ३८७ मुख्य केंद्रांवर घेतली जाईल. मंडळाचे प्रभारी अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App