औद्योगिक क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरू असून विदर्भातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरचे उद्योजक आकर्षित व्हावेत, त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करावी, यासाठी राज्यातल्या फडणवीस सरकारने पुढाकार घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज ‘ॲडव्हांटेज विदर्भ 2026 : खासदार औद्योगिक महोत्सवाचे आज उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांमध्ये प्रमुख क्षेत्रांमध्ये नवीन ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधा स्थापन करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी शरद पवारांनी पार्थ पवार च्या नावाचा आग्रह धरला, अशी बातमी सकाळ समूहाच्या साम टीव्हीने दिली. पण त्यामुळेच कवडीची किंमत वाढली की बाहेरून आलेल्या पवारांची किंमत कमी करण्यासाठी पवारांनी नवी *खेळी” केली??, असा सवाल समोर आला
अजित पवार यांच्या अकाली एक्झिट मुळे सध्या राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे. राजकारणातील एक खंबीर नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी अखेर 32 तासानंतर सुरळीत झाली आहे. महामार्गावर असलेल्या घाटात गॅसचा कंटेनर आडवा झाल्याने या वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. एकीकडे समृद्धी महामार्ग तयार केला आणि आता शक्तिपीठ महामार्गाच्या तयारीत असलेल्या सरकारचे या कोंडीमुळे अपयश समोर आले आहे. विशेष म्हणजे या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेला पर्यायी मार्गाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी
संजय राऊत यांनी आज त्यांच्या नियमित पत्रकार परिषदेत शरद पवारांना महाविकास आघाडी कडून राज्यसभेची निवडणूक लढवायची “ऑफर” दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न असतानाच, सिंचन घोटाळा पुराव्यानिशी बाहेर काढणारे जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी या प्रकरणावर आपली अत्यंत रोखठोक आणि खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवारांचा अपघात दुर्दैवी आहे, मात्र सरकारी चौकशी यंत्रणांवर माझा विश्वास राहिलेला नाही,” अशा शब्दांत पांढरे यांनी प्रशासकीय आणि न्यायालयीन व्यवस्थेवर तोफ डागली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र सुन्न असतानाच, आता या अपघाताबाबत नवनवीन माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “विमानात नक्की काय घडलं? कशा प्रकारे ही दुर्घटना झाली? याबाबत आमच्याकडे काही माहिती आली असून, ९ फेब्रुवारीनंतर मी यावर स्पष्टपणे भाष्य करणार आहे,” असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत पवार कुटुंबात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूवरून शंका उपस्थित केली. तसेच त्यांनी पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्यावरून देखील भाष्य केले. यावरून त्यांच्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे. अंजली दमानिया यांची आजची पत्रकार परिषद ऐकून समाजामध्ये किती खालच्या पातळीची विकृत असू शकते, अशी टीका चाकणकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत शक्तिपीठ महामार्ग, विरार-अलिबाग कॉरिडोर, जालना-नांदेडसह अनेक जिल्ह्यांमधील विविध एक्स्प्रेस वे आणि समृद्धी महामार्गालगतच्या ‘न्यू टाऊन’ प्रकल्पांच्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली.
पूज्य गुरुदेव – राष्ट्रनिर्माण, मानवसेवा आणि सनातन धर्माचा तेजस्वी वारसा!! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हरिद्वार, उत्तराखंड येथे, पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिरात श्रीविग्रह मूर्ती स्थापना समारंभ येथे उपस्थिती दर्शविली.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जिल्हा परिषद निवडणूक यांचा प्रचार “शांतपणे” करायचा निर्णय घेतला,
व्यवसायिका बिल गेट्स यांच्या माजी पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी म्हटले आहे की, लैंगिक गुन्हेगार एपस्टीनसोबत बिलची जवळीक त्यांच्या घटस्फोटाचे कारण ठरली
सुनेत्रा पवार यांचा शपथविधीला इतकी का घाई का झाली त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. तसेच विलीनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार पूर्ण होण्यापूर्वी का सुरू करण्यात आली. का सतत मुलाखतीला फेरा सुरू ठेवण्यात आला? विलीनीकरणाचा आणि उपमुख्यमंत्रीपदाचा कसा संबंध येतो हे जर मला सांगितले तर मी माझी भूमिका मांडेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश एमएसआरडीसी त्याचप्रमाणे पोलिसांना दिले आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियात या प्रकरणी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. त्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडचे नाव आल्यामुळे धमकी देणारा व्यक्ती कराड समर्थक असल्याचा दावा केला जात आहे. दिव्य मराठी या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी निघाले असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील सहयोग सोसायटी येथे जाऊन शरद पवार सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिलीच भेट असणार आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच या भेटीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
शरद पवारांनी राजकीय आयुष्यात अनेक चढ – उतार पाहिले. अगदी तरुण वयातच ते आमदार मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री बनले. त्यावेळी त्यांचे स्वतंत्र राजकीय व्यक्तिमत्व विकसित होत होते. पण 1985 नंतर शरद पवारांच्या राजकीय आयुष्याला जे वळण लागले, त्यानंतर त्यांचा राजकीय आलेख सोनिया ते सुनेत्रा असा उतरत गेल्याचेच चित्र समोर आले.
शेतीभूषण श्रीरंग देवबा लाड (दादा) आणि वाराणसीचे आचार्य श्री महंत भारतभूषणदासजी महाराज यांना यंदाचा पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “अधिकार” नाकारून शरद पवार आपल्याला हवे तसे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण पुढे रेटू शकतील का??,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुरंदर, पुणे येथील विमानतळासंदर्भात आढावा बैठक पार पडली
बारामतीतल्या आजच्या पत्रकार परिषदेतून शरद पवारांनी पुन्हा एकदा double game खेळली. सुनेत्रा पवारांना संधी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातानंतर राज्याच्या राजकारणात शोककळा पसरली असतानाच, आता बड्या नेत्यांच्या प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना एक महत्त्वाचा आणि मित्रत्वाचा सल्ला देणार असल्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. “अजित पवारांचा अपघात हा संशयास्पद असून, नितीन गडकरी यांनी आता छोट्या आणि खासगी विमानाने प्रवास करणे टाळावे. असे सांगणार आहे.” असे अनिल देशमुख म्हणालेत.
सुप्रीम कोर्टाने एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य नोंदणीवर तीव्र आक्षेप नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना खडेबोल सुनावलेत. एवढी बेकायदा कामे करण्याची हिंमत होतेच कशी? असा खडा सवाल कोर्टाने या प्रकरणी रोहित पवार यांना केला आहे. कोर्टाच्या या भूमिकेनंतर रोहित पवार यांनी यासंबंधीची आपली याचिका मागे घेतली आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आपण पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर कोण? काय? कसे? कुठे हे पाहण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही हे स्पष्ट आहे
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App