नाशिक : बारामतीच्या पोटनिवडणुकीत मतदानाच्या दिवशीच तीन पवारांच्या तोंडी तीन वेगवेगळ्या भाषा; राजकीय मतभेदांना फुटल्या वाटा!!, असेच राजकीय चित्र आज समोर आले. pawer family
– जय पवारांनी विषयाला फोडले तोंड
बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आज मतदान होत असताना सकाळीच जय पवार यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या विषयाला तोंड फोडले. त्या निवडणुकीमध्ये आपणच उमेदवारी करावी, असा कार्यकर्त्यांचा आणि बारामतीच्या लोकांचा आग्रह असल्याचे वक्तव्य जय पवार यांनी केले. पण त्याचवेळी आपण कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहू. लोकांना मदत करत राहू, असा खुलासा सुद्धा जय पवारने केला.
– रोहित पवारांचे वक्तव्य
जय पवार यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी दुसरे वक्तव्य केले. २०२९ बारामती पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होऊ शकतो. कारण दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण व्हावे असे वाटणारे अजित पवारच आपल्यात नाहीत. आता विलीनीकरण शक्य नाही. दोन पक्ष वेगवेगळे आहेत. अजित पवारांचा राष्ट्रवादीचा निर्णय सुनेत्रा काकी घेतील. शेवटी सत्तेमधून बाहेर पडायचा निर्णय अवघड असतो. तो नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विचारात घेऊन मगच करावा लागतो. काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. पवार कुटुंबीय एकत्र असले, तरी आता राजकीय विचार वेगळे आहेत. त्यामुळे २०२९ मध्ये पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होऊ शकते. कारण काही लोकांना सुद्धा तसेच व्हावे असेच वाटत आहे, असे वक्तव्य रोहित पवारांनी केले.
– श्रीनिवास पवारांची नाराजी
जय पवार आणि रोहित पवार या दोघांच्याही वक्तव्यावर अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी नाराजी व्यक्त केली. जय आणि रोहित या दोघांनीही आजच अशी वक्तव्ये करायला नको होती. जर तुम्हाला माहिती आहे काही लोकांची इच्छा नाही, तर सगळ्या पवारांनी एकत्र बसून समजूतीने घ्यायला हरकत नाही. भाजपला दोष देऊन काय उपयोग आहे? जर तुम्हाला कळत आहे, की कोणीतरी काही चुकीचं करतं आहे, तर तुम्ही तरी आजच अशी वक्तव्य करताय, तेही चुकीचं आहे. दोघांनीही या क्षणी बोलायची गरज नव्हती. हा परिवारातला अंतर्गत संवाद आहे. पवार कुटुंबीयांचे राजकीय निर्णय फक्त पवार साहेबच घ्यायचे. ते आज ऍडमिट आहेत. त्यांना विचारल्याशिवाय जय आणि रोहित यांनी व्यक्त केली. एखादा दिवस पवार साहेब त्यांना बोलवून त्यांना सांगतील, असे वक्तव्य श्रीनिवास पवार यांनी केले.
– मतभेदांची तिरीप बाहेर यायची ती आलीच
याच श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांच्या विरोधात त्यांचा मुलगा युगेंद्र पवार याला बारामतीतून उभे केले होते. पण आज त्यांनीच आपल्या दोन्ही पुतण्यांच्या वक्तव्यांच्या विरोधात वेगळे वक्तव्य केले. मूळात बारामतीच्या पोटनिवडणुकीत सगळ्या पवार कुटुंबाला उतरावे लागले. त्यासाठी सुनेत्रा पवारांच्या विक्रमी मताधिक्याचा मुद्दा समोर आणावा लागला. पण सगळे पवार कुटुंब एक होऊन सुद्धा अंतर्गत मतभेदाची तिरीप बाहेर यायची राहिली नाही. बारामतीतल्या नेमक्या मतदानाच्या दिवशीच पवार कुटुंबीयांमधल्या मतभेदाची तिरीप बाहेर आली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App