विशेष प्रतिनिधी
पुणे: ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) च्या अचानक वाढणाऱ्या भाड्यामुळे त्रस्त झालेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडकर प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशातील पहिली सहकारी तत्त्वावर चालणारी आणि चालकांच्या मालकीची ‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) सेवा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे. पावसाळा असो वा सण-उत्सव, अवाढव्य भाडेवाढ न करता ग्राहकांना रास्त आणि निश्चित दरात सेवा देण्याचा निर्धार या टॅक्सी सेवेने केला आहे. Pune and Pimpri-Chinchwad
यशस्वी चाचणीनंतर ही सेवा आता प्रवाशांसाठी ॲपवर उपलब्ध झाली आहे. इतर खाजगी कंपन्यांच्या तुलनेत या सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे चालकांकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही. या ‘झिरो कमिशन’ मॉडेलमुळे चालकांच्या थेट उत्पन्नात वाढ होणार आहे. सध्या या प्लॅटफॉर्मवर ३५ हजारांहून अधिक चालकांनी नोंदणी केली आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (RTO) नियमांनुसार आणि चालकांशी चर्चा करूनच याचे दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे.
इतर ॲप्सवर गर्दीच्या वेळी किंवा पावसात भाडे दुप्पट-तिप्पट होते. मात्र, ‘भारत टॅक्सी’मध्ये दिवसभर मूळ भाडे स्थिर राहणार आहे. फक्त सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत (Peak Hours) मूळ भाड्यावर केवळ १० टक्के वाढ लागू केली जाईल.
पुण्यासाठी भारत टॅक्सीचे दरपत्रक
ऑटो-रिक्षा: 18 रुपये प्रति किलोमीटर
मोटारसायकल (राइड विथ पिलियन): 24 रुपये प्रति किलोमीटर
सेडान कॅब : 25 रुपये प्रति किलोमीटर
एसयूव्ही : 32 रुपये प्रति किलोमीटर
भारत टॅक्सीने पुणे ते मुंबई आंतरशहरी सेवेचे दरही जाहीर केले आहेत:
हॅचबॅक: 21 रुपये प्रति किलोमीटर
सेडान: 23 रुपये प्रति किलोमीटर
एसयूव्ही: ३० रुपये प्रति किलोमीटर
तसेच, पुणे विमानतळावरील प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष बूथ सुरू करण्याबाबत विमानतळ प्रशासनाशी बोलणी सुरू असून, ही सेवा लवकरच सुरू होणार आहे. पुणे आणि मुंबई दरम्यानच्या सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहता, येत्या काळात पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर आणि पुणे-कोल्हापूर या प्रमुख मार्गांवरही ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App