नगरसेवक रमेश म्हात्रेच्या सुटकेचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने जामीनावरील स्थगिती उठवली

विशेष प्रतिनिधी

मुंबई : गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेची आधारवाडी कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झालाय. शुक्रवारी (दि.7) सकाळी उच्च न्यायालया म्हात्रेच्या सुटकेचे सविस्तर आदेश जारी करणार आहे. गुरूवारी (दि.6) मुंबई उच्च न्यायालयाच्या व्यस्त वेळापत्रकामुळं हे आदेश अखेरच्या काही मिनिटांत देणं शक्य नाही. त्यामुळं शुक्रवारी सकाळी 11 वाजता नियमित कामकाज सुरू होण्यापर्वीच ते देऊ असं प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं कल्याणमधील पालिका रूग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रेला दिलेल्या जामिनावर सुमोटो याचिका दाखल करत जामीनाला दिलेली स्थगिती उठवत असल्याचं उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं सांगितलं.Ramesh Mhat

गुरूवारच्या (दि.6) सुनावणीत उच्च न्यायालयानं सर्व प्रतिवादानंतर म्हात्रेला बाहेर काढण्याबाबतच्या अटिशर्तींबाबतच मत विचारून घेतलं. कारण रमेश म्हात्रेच्या सुटकेच्या आदेशात कठोर अटिशर्तींचा समावेश असेल, असे स्पष्ट संकेत उच्च न्यायालयानं दिलेत.

हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात वर्ग करून तातडीनं याप्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं गुरूवारच्या सुनावणीत दिलेत. तसंच पीडित डॉक्टरांना पुन्हा रूग्णालयात येऊन काम करणं सुरक्षित वाटावं यासाठी त्यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेशही उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेतून घटनेतील आवाज आणि सीसीटीव्हीच्या नमुन्यांचे अहवाल पुढील 10 दिवसात तपास अधिकाऱ्यांकडं सुपूर्द करावेत. त्यानंतर पुढील पाच दिवसांत तपास अधिकाऱ्यांनी आरोपपत्र दाखल करावं, असे निर्देशही जारी करत असल्याचं उच्च न्यायालयानं गुरूवारी स्पष्ट केलं आहे.



 

घटनेच्या दिवशी मारहाण झालेल्या पीडित डॉक्टरांना धमकीचे असंख्य फोनकॉल्स आले होते. तसंच या घटनेनंतर म्हात्रे यांच्यासह त्यांच्यासोबत आलेल्या गुंडांनीही त्यांना धमकी दिली की, “तुमचे चेहरे आम्ही पाहिलेत. बाहेर आल्यावरही तुम्हाला सोडणार नाही.” त्या भितीनं मारहाण झालेले दोन्ही डॉक्टर अद्याप कामावर परतलेले नाहीत. या प्रकरणात मारहाण झालेली पीडित महिला डॉक्टर तर इतकी बिथरलीय की, आम्ही तिला धीर देत आहोत. आयएमएच्यावतीनं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. या सुमोटो याचिकेत न्यायालयाला मदत करण्यासाठी अमायकस क्युरी (कोर्टाचा मित्र) म्हणून ज्येष्ठ कायदेतज्ञ अशोक मुंदुरगी यांनी सोमवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केलं की, “याप्रकरणी घडलेला गुन्हा हा काही आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देण्याइतका गंभीर नाही. मात्र आरोपीची पार्श्वभूमी पाहता पीडित डॉक्टरांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.”

काही कारणावरून कल्याणच्या पालिका रूग्णालयात घुसून शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चार-पाच जणांनी मिळून तीन डॉक्टरांना मारहाण केली होती. यात एका महिला डॉक्टरचाही समावेश होता. त्यामुळं त्यांची मानसिकता त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या डॉक्टरांना इजा पोहोचवण्याचीच होती, हे स्पष्ट होतंय. म्हात्रे आणि त्याच्या साथीदारांच्या कृतीचा सरकारी आणि पालिकेच्या सेवेत असलेल्या डॉक्टरांच्या मानसिकतेवर किती गंभीर परिणाम होईल?, याची कदाचित दंडाधिकाऱ्यांना आरोपींना जामीन देताना कल्पना आली नसावी. प्रशासकीय सेवेत असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही पूर्णपणे सरकारची आहे. त्यात जराही हयगय होता कामा नये, असं उच्च न्यायालयानं स्पष्ट करत सुट्टीच्या दिवशी विशेष सुनावणी घेत हा जामीन रद्द करत म्हात्रेंसह इतर सर्व आरोपींना शरण येण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं दिले होते.

Bombay High Court Gives Green Signal to Ramesh Mhatre’s Release from Aadharwadi Jail

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात