पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह पुणे पोलिस दलातील २५ अधिकारी-अंमलदारांना सेवा पदके

विशेष प्रतिनिधी

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अतिउत्कृष्ट आणि उत्कृष्ट सेवा पदकांमध्ये पुणे शहर पोलिस दलातील २५ अधिकारी-अंमलदारांचा समावेश झाला आहे. दीर्घकालीन, निष्कलंक आणि उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांच्यासह नऊ जणांना अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. तर १६ अधिकारी-अंमलदारांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. Pune Police Commissioner

अतिउत्कृष्ट सेवा पदक मिळालेल्यांमध्ये सहायक पोलिस फौजदार दिलीप दिगंबर झानपुरे, नितीन तुळशीराम जगताप, राजस हुसेन शेख, राजेंद्र आत्माराम पालांडे, सत्यवान बबन साबळे आणि संतोष भगवान कुचेकर यांचा समावेश आहे.



उत्कृष्ट सेवा पदकासाठी सहपोलिस आयुक्त संजय दराडे, पोलिस निरीक्षक कैलास भिकू डाबेराव, पोलिस निरीक्षक स्वप्नाली चंद्रकांत शिंदे, पोलिस उमेश अंबादास गित्ते, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत शांताराम लोहकरे आणि पोलिस उपनिरीक्षक अमित अधिकराव सिद-पाटील यांची निवड झाली आहे.

याशिवाय पोलिस हवालदार सुधीर अंकुश इंगळे, योगराज हरिश्चंद्र घाटगे, मच्छिंद्र कांतीलाल भंडारे, सचिन सुभाष अहिवळे, राहुल रामचंद्र माने, संदीप राम पाटील, शैलेश शरद सुर्वे, सत्यवान ज्ञानोबा ठोंबरे, महिला हवालदार धनश्री विजय कामठे आणि पोलिस शिपाई हनुमंत विलास थोपटे यांनाही उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.

दरम्यान, पोलिस उपअधीक्षक श्रीजितेंद्र आनंद कदम (सीआयडी) यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलिस पदक जाहीर झाले आहे.

दीर्घकाळ प्रामाणिकपणे आणि उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व अंमलदारांच्या सेवेला मिळालेल्या या गौरवामुळे पुणे पोलिस दलात आनंदाचे वातावरण आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदक जाहीर झालेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

अपर पोलिस महासंचालक तथा संचालक, पोलिस दळणवळण, माहिती-तंत्रज्ञान व परिवहन मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही सेवा पदकांनी गौरविण्यात आले आहे. पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत ढाकणे यांना उत्कृष्ट सेवा पदक, तर पोलिस उपनिरीक्षक विजय कुंभार आणि पोलिस उपनिरीक्षक संतोष महाडिक यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.

Pune Police Commissioner Amitesh Kumar Among 25 Personnel Awarded Service Medals

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात