स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड – पेण ग्रोथ सेंटरची घोषणा करण्यात आली.
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने विनोद तावडे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे सह-प्रभारी असतील. केरळ व्यतिरिक्त, तावडे चंदीगड महापौर निवडणुकीचे निरीक्षक देखील असतील.
काँग्रेसवाले हरले तरी भांडणे आणि जिंकले तरी भांडणेच!!, असला प्रकार त्या पक्षातून समोर आलाय. काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत पराभूत झाला. त्यांनी ठाकरे बंधूंशी फारकत घेतली आणि वंचित बहुजन आघाडीशी युती केली. पण ती दोन्ही पक्षांना राजकीय दृष्ट्या पचली नाही. त्यामुळे मुंबईत काँग्रेसचे फक्त 24 नगरसेवक निवडून आले. २२७ पैकी 24 हा परफॉर्मन्स बघून काँग्रेसचे मुंबईतले नेते भडकले.
राज्य सरकारकडून वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांतील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात असून, आता या योजनेच्या निकषांची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात येत आहे. प्रशासनाकडून सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले होते आणि त्यासाठी वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली होती. आता या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची सूचना दिली आहे.
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येऊन निवडणुका लढवायचा प्रयोग केला, पण त्याला फार मर्यादित यश मिळाले. महापालिकांच्या निवडणुकांनंतर काँग्रेसने वेगळा मार्ग पत्करून जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ओबीसी बहुजन आघाडीशी युती केली. त्या पाठोपाठ वंचित बहुजन आघाडी सुद्धा ओबीसी आरक्षण वाजवायच्या मुद्द्यावर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानावर आली.
नागपूरमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (SDAL) च्या प्लांटमधून ‘गाईडेड पिनाका’ रॉकेट प्रणालीला हिरवा झेंडा दाखवला. याच प्लांटमधून आता गाईडेड पिनाकाची निर्यात आर्मेनियाला केली जाईल. याप्रसंगी त्यांनी SDAL च्या मीडियम कॅलिबर दारुगोळा सुविधेचे (एम्युनिशन फॅसिलिटी) देखील उद्घाटन केले
भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेट वे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणूकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
केवळ फालतू बातम्यांच्या पुड्या सोडून मुंबईतल्या भाजपच्या महापौराला रोखता येणार आहे का??, असा सवाल मराठी माध्यमांच्या वेगवेगळ्या बातम्यांमुळे समोर आला.
राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणासंदर्भात महत्त्वाची हालचाल सुरू झाली असून, या विषयावर तोडगा काढण्यासाठी आणि आरक्षण ठरवण्यासाठी नगरविकास विभागाकडून उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने याबाबत अधिकृत पत्रक जारी केले असून, ही बैठक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान राज्याचे नगरविकास मंत्री भूषवणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून सध्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याचे म्हटले आहे. महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी महायुतीला पसंती दिली आहे, आम्ही जनमताचा आदर करणार. विरोधकांकडून अफवा पसरवण्यात येत असून त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे शिंदे म्हणाले. तसेच बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असावा ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते, असेही शिंदे म्हणाले.
भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करत बाबा सिद्दिकी सारखीच नवनीत राणा यांची हत्या करू, अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पूर्वी देखील नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो. ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक एकोसिस्टम तयार केली आहे. त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आणि दोन महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याचा पेच आता सर्वोच्च न्यायालयात सुटण्याच्या मार्गावर आहे. शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाबाबत येत्या बुधवारपासून (२१ जानेवारी) अंतिम सुनावणीला सुरुवात होत आहे
बारामती बाराची, पराभवानंतरही अजितदादांची खुमखुमी!!, असा प्रकार समोर आला. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही पवार काका – पुतण्याचा दणकून पराभव झाला. भाजपशी टक्कर घेणे दोन्ही पवारांना एकत्र येऊन सुद्धा जमले नाही, भाजपवर नाही नाही ते आरोप करून अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांची सत्ता खेचून आणता आली नाही, तरीसुद्धा अजित पवारांची खुमखुमी शमली नाही, याचेच प्रत्यंतर आले.
महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत तलवार नाचवल्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांच्यावर गुन्हा का दाखवण्यात आला नाही? असा सवाल एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, मालेगाव महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने एमआयएमचा पाठिंबा मागितल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने दुहेरी खेळी केली मुंबईत त्यांनी काँग्रेस बरोबर युती केली पण उल्हासनगर मध्ये सत्तेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी शिंदे सेनेबरोबर आघाडी केली.
“शिक्षणामुळे आज समाजात माहिती आणि बुद्धीने समृद्ध असलेला वर्ग दिसत आहे. मात्र, ज्ञानकेंद्रित शिक्षणाच्या अभावामुळे परिपूर्ण माणूस घडण्याची प्रक्रिया काहीशी खुंटली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, धर्मच मला आणि नरेंद्र मोदींना चालवत आहे. ते म्हणाले की, धर्म संपूर्ण ब्रह्मांडाचा चालक आहे. जेव्हा सृष्टी अस्तित्वात आली, तेव्हा तिच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणारे नियम धर्म बनले. सर्व काही त्याच सिद्धांतावर चालते.
(नसलेल्या) सूत्रांच्या हवाल्याने वाटेल ते व्हिडिओ बनवा; कसेही करून भाजपच्या फांद्यांना ठाकरे लटकवा!!, असला प्रकार मराठी माध्यमांच्या लिबरल पत्रकारितेतून समोर आला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर त्यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त देखील ठरला असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. पक्षप्रवेश ही फक्त टेक्निकल बाब आता राहिलेली आहे, ती पण लवकरच पूर्ण होईल, असे विधान पाटील यांनी केले आहे.
मुंबईचा महापौर कोणाचा होणार? यावरून कमालीची गुप्तता आणि रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील ‘ताज लँडस् एन्ड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. आज त्यांनी या नगरसेवकांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी शिंदेंनी संवाद साधला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच आता बीडच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. संगीता ठोंबरे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का बसला आहे. तसेच संगीता ठोंबरे यांच्या पक्षप्रवेशाने बीडमध्ये शिंदे गटाची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईच्या महापौरपदावरून रंगलेल्या चर्चेत आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. “उद्धव ठाकरे सध्या डिप्रेशनमध्ये गेले असून ते जे बोलतात त्याला वास्तवाचा कोणताही आधार नाही. ज्यांच्याकडे संख्याबळ नाही, त्यांचा महापौर काय आकाशातून पडणार का?” अशा बोचऱ्या शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या निमित्ताने दोन पवार एकत्र येतील, पण ते पुणे जिल्हा परिषदेच्या पलीकडे जातील का??, असा सवाल महापालिका निवडणुकांच्या निकालांमुळे समोर आला आहे.
झ्युरिक मधल्या विवानचे देवेंद्र फडणवीस झाले फॅन; लाडक्या बहिणींबरोबरचा फोटो आणि व्हिडिओ केला शेअर!!, असे आज स्वित्झर्लंड मध्ये घडले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App