govinddev giri maharaj : गोविंददेव गिरी महाराज यांच्या मुखातून तथागत कथा ऐकायची उद्या पासून नाशिककरांना तीन दिवसांची संधी!!

govinddev giri maharaj

विशेष प्रतिनिधी

नाशिक : govinddev giri maharaj गोविंददेव गिरी महाराज यांच्या मुखातून तथागत कथा ऐकायची नाशिककरांना उद्या पासून तीन दिवसांची संधी मिळणार असून येत्या १ मे ते ३ मे २०२६ असा तीन दिवसांचा कार्यक्रम वसंत व्याख्यानमाला आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आयोजित केला आहे.govinddev giri maharaj

आजच्या अत्यंत तणावपूर्ण वातावरणात भगवान बुद्धांचे जीवन आणि त्यांनी दिलेला शांतीचा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. तथागतांनी मानवाला मध्यम मार्ग दाखविला. शांती, अहिंसा करुणा आणि समतेचा संदेश दिला.govinddev giri maharaj



भगवान बुद्धांची कथा केवळ ऐतिहासिक स्वरूपाचे वर्णन नसून त्याद्वारे मानवी मनाचा शोध घेऊन मूल्याधिष्ठित जीवनाकडे नेणारी दिशा दाखविणारी आहे. गोविंददेव गिरी महाराजांच्या रसाळ वाणीतून आणि त्यांच्या प्रगल्भ विवेचनातून श्रोत्यांना आत्मपरिवर्तनाची प्रेरणा मिळेल.

१ मे ते ३ मे अशा तीन दिवसांमध्ये गोदावरी घाटावर यशवंत महाराज पटांगणात सायंकाळी ६.०० ते ८.०० ही तथागत कथा होईल. संस्कार संस्कृती आणि पर्यावरणाचा त्रिवेणी संगम असणाऱ्या या सोहळ्यात नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जयंत गायधनी, राजेंद्र गायकवाड आणि संजय साळवे यांनी केले आहे.

Nashik residents have a three-day opportunity to hear the story of the Tathagata from the mouth of Govinddev Giri Maharaj starting tomorrow!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात