विशेष प्रतिनिधी
मुंबई : नाही, नाही म्हणता एकेदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच १०० टक्के राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडतील, अशी जोरदार टीका भाजपचे नेते निलेश राणे यांनी केली. Sharad Pawar will overthrow the state government 100 percent ; Strong criticism of Nilesh Rane
राज्य सरकारने शेतकरी आणि पूरग्रस्तांना पॅकेज जाहीर केलं असले तरीसुद्धा कोकण आणि मराठवाडा हे प्रतीक्षेतच आहेत. त्यांना एकही रुपया मिळाला नाही. कॅबिनेटमध्ये आज निधी जाहीर झाला. परंतु तो हेक्टरी किती मिळणार ? हे अस्पष्ट आहे. त्यांच्या घोषणा या हवेत गोळीबार असून जमिनीवर काही नसते, याचा मला अनुभव आहे, असे राणे म्हणाले. कोकणावर संकट आले. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र व आता मराठवाडावर संकट येऊन विदर्भावर संकट कोसळून शेतकरी उद्ध्वस्त झाला. यात एक सुद्धा पैसा माझ्या तरी मतदारसंघात मिळाला नाही.
गेल्यावर्षी थिएटर उघडण्याला परवानगी नव्हती. तरीसुद्धा दसरा मेळावा थिएटरमध्ये झाला.त्यांना लोकांचं काही पडलेला नाही तसेच शेतकऱ्यांची कणव देखील नाही
महाराष्ट्रात एक वर्गही सुखी नाही. विद्यार्थ्यांच्या परीक्षेत देखील घोळ झालेला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांचं कुलगुरू ऐकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यांचे सर्वच नेते कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकलेले आहेत. त्यात नवाब मलिक, धनंजय मुंडे सोबत ठाण्यातले जितेंद्र आव्हाड देखील आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा जनता ठेवणार आहे.
शरद पवारांनी सरकार पडणार नाही, असे जरी म्हटले असले तरी पवारच सरकार पाडतील आणि पडणार नाही म्हंटल्यावर म्हणजे शंभर टक्के पडणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App