जगभरात आपल्या देशाचं नाव प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या नेहा नारखेडे


नेहा नारखेडे पुण्यात वाढलेली एक मराठी तरुणी. कुठलीही पार्श्वभूमी नसताना अमेरिकेत शिकायला जाते. तिथे स्वकर्तृत्वावर टेक्नोक्रॅट किंवा तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजिका होते. हा प्रवास म्हणावा तसा सोपा अजिबात नाहीये. नेहा नारखेडे हे नावच प्रेरणादायी यशाची एक खरी बातमी आहे. नेहा नारखेडे एक अमेरिकन टेक्नॉलॉजी उद्योजिका आहेत. तसेच कॉन्फ्लुएंट या स्ट्रीमिंग डेटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या सह-संस्थापक आणि माजी सीइओ आहेत.

Neha Narkhede, who took her country’s name to the pinnacle of progress all over the world

नेहा यांचा जन्म पुण्यातला. पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी ह्या कॉलेज मधून त्यांनी बॅचलर ऑफ सायन्स इन इंजिनिअरिंग ही पदवी संपादन केली. त्यांनी आपली मास्टर्स डिग्री जॉर्जिया टेक येथून संपादन केली. मास्टर्स केल्यानंतर नारखेडे यांनी पहिली नोकरी २००७ मध्ये मुख्य सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ओरॅकल या कंपनीमध्ये सुरू केली. ओरॅकल नंतर त्यांनी लिंक्डइन या कंपनीमध्ये स्ट्रीम इन्फ्रास्ट्रक्चरची प्रमुख म्हणून काम केले.

२०११ मध्ये लिंक्डइनमध्ये काम करत असतानाच नारखेडे यांनी जुन राव आणि जय क्रेप्स या सहयोगीसह अपाचे काफ्का प्लॅटफॉर्म तयार केले. लिंक्डइनमध्ये कंपनीमध्ये एका प्रोजेक्टवर काम करत असताना त्यांना ही कल्पना सुचली होती. आणि म्हणूनच काफ्काला ओपन सोर्स या प्लॅटफॉर्मचा विकास झाला. ह्या यशा नंतर त्यांनी २०१४ मध्ये राव आणि क्रेप्ससह कॉन्फ्लुएंट या स्टार्टअप कंपनीची स्थापना केली. आणि बी २ बी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी म्हणून कॉन्फ्लुएंट सुरू करण्याचा निर्णय घेतला. ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म अपाचे काफ्का बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

२०१७ मध्ये त्यांनी ग्वेन शपीरा आणि टॉड पॉलिनो यांच्यासह काफ्का: द डेफिनिटीव्ह गाईड या पुस्तकाचे सह-लेखण केले. या पुस्तकात काफ्का प्लॅटफॉर्म तयार करणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दल सर्व माहिती आहे. कॉन्फ्लुएंट कंपनीच्या त्या सीइओ होत्या. त्यानंतर २०२० पर्यंत त्यांनी मुख्य उत्पादन अधिकारी म्हणूनही भूमिका घेतली होती. त्या आता बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या सदस्य म्हणून काम करतात

त्यांनी आणि त्यांच्या टीमने मिळून कॉन्फ्लुएंट कंपनीमध्ये २०१९ साली $ १२५ दशलक्ष इतका नफा मिळवला. ज्यामुळे त्याचे एकूण निधी २०१९ मध्ये $ २०६ दशलक्ष झाले. आणि एप्रिल २०२० मध्ये कंपनीने $ २५० दशलक्ष उभे केले आणि त्याचे एकूण निधी $ ४५६ दशलक्ष केले.

२०२० मध्ये त्यांना फोर्ब्सने अमेरिकेच्या सेल्फ मेड महिला सन्मानित केले होते. 2017 साली एम आय टी टेक्नॉलॉजी ने त्यांना 35 वर्षाखालील एक सर्वोत्कृष्ट इनोव्हेटर्स म्हणून सन्मानित केले होते. 2018 मध्ये टेक बाय फोर्ब्सच्या जगातील सर्वोत्कृष्ट प्रभावशाली 50 महिलांच्या यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होता. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या ओरॅकल कोड कॉन्फरन्समध्ये त्यांनी ओरॅकल ग्राउंड ब्रेकर अवॉर्ड मिळवला होता.

Neha Narkhede, who took her country’s name to the pinnacle of progress all over the world

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात