प्रतिनिधी
नवी दिल्ली – इंधन दरांबरोबरच आता एलपीजी सिलिंडरच्या किमतीचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. विना-अनुदानित (नॉन-सब्सिडी) १४.२ किलो सिलिंडरच्या किमतीत गेल्या आठवड्यात पुन्हा तब्बल १५ रुपयांनी वाढ झाली.LPG gas pricses hiked
१ सप्टेंबरला १४.२ किलोच्या विना-अनुदानित एलपीजी सिलिंडरचे दर २५ रुपयांनी वाढले होते. यापूर्वी तेल उत्पादक कंपन्यांनी १८ ऑगस्टला या किमतीत २५ रुपयांनी वाढ केली होती. दिल्लीचा विचार केला तर मागील एका वर्षात विना-अनुदानित सिलिंडरचे दर मागील एका वर्षात ३०५.५० रुपयांनी वाढले.
आजपासून गॅस सिलिंडरचे दरामध्ये वाढ, नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टिम; १ ऑक्टोबरपासून लागू झाले हे ६ मोठे बदल
मुंबई-दिल्लीत विना-अनुदानित एलपीजी सिलिंडर आता ८९९.५० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे; तर ५ किलोचा सिलिंडर यापुढे ५०२ रुपयांनी विकला जाईल. त्यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांचे महिन्याचे बजेट यापुढे पुन्हा एकदा कोलमडणार आहे.
नुकतेच एक ऑक्टोबरला १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरचे दरही वाढले होते. त्यानंतर आता विना-अनुदानित एलपीजी सिलिंडरचे दर भडकले आहेत. यापूर्वीच्या दरांचा विचार केला तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार १४.२ किलो सिलिंडर दर वाढण्यापूर्वी दिल्लीत ८८४.५० रुपये, मुंबईत ८८४.५० रुपये, कोलकत्तामध्ये ९११ रुपये, तर चेन्नईमध्ये ९००.५० रुपये असे होते.
आता पुन्हा दरवाढ झाल्याने हे दर १५ रुपयांनी वाढतील. त्यानुसार दिल्लीत ८९९.५० रुपये, मुंबईत ८९९.५० रुपये, कोलकत्ता ९११ रुपये, चेन्नई ९१५.५० रुपये, पटना ९९८ रुपये अशी दरवाढ पाहायला मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App