ठाकरे सरकारने २८०० कोटी रुपये थकीत ठेवले, कोळशाचं नियोजनच केलं नाही, म्हणूनच ही वेळ, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

BJP Leader Chandrashekhar Bawankule Allegations on MVA Thackeray Govt Over Electricity Crisis in Press Conf

Electricity Crisis : देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही कोळसा टंचाईची ओरड होत आहे. यावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये वार-पलटवार सुरू आहेत. यादरम्यान भाजप नेते व माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील वीज संकटाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्याला अंधारात  जाण्याची वेळ का आली, यामागे काय कारणे आहेत, याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत. BJP Leader Chandrashekhar Bawankule Allegations on MVA Thackeray Govt Over Electricity Crisis in Press Conf


प्रतिनिधी

नागपूर : देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही कोळसा टंचाईची ओरड होत आहे. यावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये वार-पलटवार सुरू आहेत. यादरम्यान भाजप नेते व माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील वीज संकटाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्याला अंधारात जाण्याची वेळ का आली, यामागे काय कारणे आहेत, याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत.

कोळशाचे 2800 कोटी थकीत!

माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सरकार आणि वीज पुरवठा करणाऱ्या तिन्ही कंपन्यांमध्ये काहीच ताळमेळ नसल्यानंच राज्यावर ही वेळ आली आहे. 2800 कोटी रुपये कोळशाचे थकीत असल्याने महाराष्ट्रावर अंधारात जाण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारचा तिन्ही कंपन्यांशी ताळमेळ नाही. कोळसा लिफ्टिंगची परवानगी न दिल्याने ही वेळ राज्यावर आली आहे. ऊर्जा विभागाने कोळशाचे योग्य नियोजन केलं नाही. कोळशाचा पुरेसा साठा केलाच नाही. महाजनकोकडे कंत्राटी कामगारांचे पगार द्यायला पैसे नाही. गरज भासल्यास मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांनी महाजेनकोला 4-5 हजार कोटी द्यावे, कर्ज घ्यावं पण यातलं काहीही सरकारने केलं नाही, असा आरोपही त्यांनी केला. ते असेही म्हणाले की, आमचं सरकार असतं तर तातडीने 2800 कोटी रुपये दिले असते. दिल्लीत जाऊन बसलो असतो आणि कोळसा मिळवला असता. आमचं सरकार असतं तर ही वेळ आली नसती. शेतकऱ्यांना वीज दिल्याने कधीही वीज कंपनी घाट्यात येत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

13-13 संच बंद, लोडशेडिंग सुरू

बावनकुळे म्हणाले की, महाजेनकोकडे दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे, कोळशाअभावी वीजनिर्मितीचे राज्यात 13-13 संच बंद झाले आहेत. ग्रामीण भागात लोडशेडिंग सुरु झालंय. संपूर्ण राज्य काळोखात जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. ऊर्जा विभागाने योग्य नियोजन न केल्याने ही वेळ आलीय, असं ते म्हणाले.

राज्यात किती आहे कोळसा?

महानिर्मितीने एका पत्रकाद्वारे राज्यातील कोळशाच्या सद्य:स्थितीबाबत माहिती दिली आहे. यनुसार, सद्य:स्थितीत वीज निर्मितीसाठी लागणार कोळसा पुरवठा परिस्थिती सुधारली असून दररोज 90 हजार ते 1 लक्ष मे. टन कोळशाचा पुरवठा होत आहे. कोळशाचे नियोजन करण्यासाठी महानिर्मितीचे, भुसावळ 210 व 500 मे.वॅ. चंद्रपूर 500 मे.वॅ., पारस 210 मे.वॅ. हे संच बंद ठेवण्यात आले होते. यापैकी कोळसा पुरवठ्यात वाढ झाल्याने भुसावळ 500 मे.वॅ. हा संच सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महावितरणने काय म्हटले?

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले की, वीज कंपनी 20 रुपये प्रति युनिटच्या जास्त दराने वीज खरेदी करत आहे, जेणेकरून लोकांना कोणतीही अडचण येऊ नये. विजय सिंघल म्हणाले की, कोळशाची परिस्थिती पाहता पुढील 10 दिवस परिस्थिती नियंत्रणात राहणे अपेक्षित आहे. सिंघल यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की, राज्यात सुमारे 15 ते 20,000 मेगावॅट विजेची कमतरता आहे. यामुळे त्यांना इतर ठिकाणाहून वीज खरेदी करावी लागत आहे. यामध्ये त्यांना प्रति युनिट 20 रुपये इतके पैसे द्यावे लागतात.

विजय सिंघल यांनी सांगितले की, परिस्थिती अशी झाली आहे की 3330 मेगावॅट वीज पुरवली जात नाही. ही कमतरता भरून काढण्यासाठी तत्काळ खरेदीसह जलविद्युत आणि इतर स्रोतांमधून वीज पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणाले की, देशभरात कोळशाच्या कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून विजेचे उत्पादन कमी होत आहे. ते म्हणाले की, चंद्रपुरातील महाजेनको, भुसावळ आणि नाशिक येथील 210 मेगावॅटचे युनिट, पारस -250 मेगावॅट आणि भुसावळ आणि चंद्रपूर येथील 500 मेगावॅट वीज युनिट तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. याशिवाय पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेड (गुजरात) चे 640 मेगावॅटचे चार युनिट आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेड (अमरावती) चे 810 मेगावॅटचे तीन युनिटदेखील बंद आहेत.

बाहेरून महागड्या दराने वीज खरेदी

सध्या, विजेची मागणी आणि उपलब्धता यामध्ये 3330 मेगावॅटचे अंतर दिसून येत आहे. ही कमतरता पूर्ण करण्यासाठी बाजारातून वीज खरेदी केली जात आहे. देशभरात विजेच्या वाढत्या मागणीमुळे वीज महाग होत आहे. खुल्या बाजारात 13.60 रुपये प्रति युनिट दराने 700 मेगावॅट वीज खरेदी केली जात आहे. या व्यतिरिक्त, कोयना धरणाद्वारे तसेच इतर लहान जलविद्युत केंद्रांद्वारे आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारेही वीज खरेदी केली जात आहे.

BJP Leader Chandrashekhar Bawankule Allegations on MVA Thackeray Govt Over Electricity Crisis in Press Conf

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात