वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राज्यांच्या निवडणुकीत मते मिळवायची असतील तर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर अवलंबून राहून चालणार नाही. आपल्याला लोकांमध्ये जाऊन काम करावे लागेल. त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाययोजना कराव्या लागतील, अशा शब्दात केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी हरियाणात भाजप कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कामात शैथिल्य आणू नये यासाठी आपण हे बोलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. No guarantee pm narendra modi name alone will get votes says union minister rao indrajit singh haryana polls
भाजप तिसऱ्यांदा हरियाणामध्ये सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करत असताना एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अवलंबून राहून ते होऊ शकत नाही असे वक्तव्य राव इंद्रजित सिंह यांनी केल्याचे पक्षाच्या बैठकीमधील एक व्हिडीओतून समोर आले आहे.
नरेंद्र मोदींचा आशीर्वाद आपल्यावर आणि राज्यावर आहे हे ठीक आहे. पण त्यांच्या एकटयाच्या नावे मते मिळतील याची काही शाश्वती नाही. मतदार मोदींच्या नावे मते देतील असा आपला हेतू असू शकतो, पण हे सर्व तळागळात काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. मतदान मत देतील हे त्यांच्यावरच अवलंबून आहे, असे परखड बोल त्यांनी ऐकवले आहेत.
यावेळी त्यांनी भाजपाच्या २०१४ मधील मोठ्या विजयाचा उल्लेख केला. केंद्रात मोदींमुळेच भाजपा सत्ता स्थापन करु शकली हे आम्हाला मान्य आहे. त्याचा राज्यांमध्येही फरक पडला. हरियाणातही पहिल्यांदा भाजपाने आपले सरकार स्थापन केले. दुसऱ्यांदाही भाजपाला यश मिळाले. पण अशावेळी शक्यतो दुसऱ्या पक्षाला संधी मिळते.
पहिल्यावेळी भाजपाला ९० पैकी ४७ जागा मिळाल्या, तर दुसऱ्यावेळी ४० जागा मिळाल्या असं सांगताना विजयी आकडेवारी कमी होत असते असे त्यांनी सांगितले. पण या ४५ जागा आपण राखू शकतो का? याचा विचार करणे गरजेचे आहे, असे राव इंद्रजित सिंह यांनी कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेत्यांना सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App