पवार हे सगळ्यांचे गुरू असल्यामुळे पवार आणि त्यांचे शिष्य काहीही झालं की, त्याचा दोष केंद्र सरकारला देऊन मोकळे होतात.Chandrakant Patil’s big statement; Said – “Pawar is not a disciple of a raw guru enough not to accept the offer of the Center”
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल नागपुरात माध्यमांशी चर्चा करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की , “केंद्रात सत्ता असलेल्या पक्षासोबत जर महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शरद पवारांना ऑफर आली असेल तर ते ही ऑफर न स्वीकारण्याइतके कच्च्या गुरूंचे चेले नाहीत, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. ”
भाजप राज्यात सरकार बनविण्यास उत्सुक नाही. आम्ही ( भाजप ) प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. पण, शरद पवारांना केंद्रातून ऑफर मिळाली असती तर त्यांना केंद्रामध्ये असलेल्या पक्षासोबतच राज्यात सरकार बनविण्यास प्राथमिकता दिली असती. त्यांना काय म्हणायचं आहे हे सर्वसामान्य माणसांना नीट कळतं, असेही पाटील म्हणाले.
पुढे पाटलांनी अशी टीका केली की , पवार हे सगळ्यांचे गुरू असल्यामुळे पवार आणि त्यांचे शिष्य काहीही झालं की, त्याचा दोष केंद्र सरकारला देऊन मोकळे होतात. केंद्राने कोळसा दिला नाही असे ते म्हणतील. परंतु, पावसामुळे कोळसा कमी मिळेल, त्यामुळे तो वेळेत स्टॉक करा, असे केंद्राने आधीच सांगितले होते. मात्र, ते याबाबत बोलणार नाहीत, केंद्राच्या इशाऱ्यानंतरही कोळशाचा साठा करण्यात कमी पडलो, हेही ते सांगणार नाहीत,
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App