पतीला सोडल्यानंतर तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचे प्रियकरासोबत रोमँटिक फोटोशूट

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बाळाला जन्म दिल्यावर त्याचा पिता कोण यावरून चर्चेत आलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी पतीला सोडले होते.आता प्रियकरासोबतचे त्यांचे रोमँटिक फोटोशूट चर्चेत आले आहे.Romantic photoshoot of Trinamool MP Nusrat Jahan with boyfriend after leaving her husband

अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ यांनी काही दिवसांपूर्वीच बाळाला जन्म दिला.त्यानंतर बाळ नक्की कोणाचं आहे? बाळाच्या बाबांचं नाव काय आहे? अशा चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर आता नुसरत जहाँ यांनी प्रियकर आणि अभिनेता यशदास गुप्तासोबत केलेला रोमांटिक फोटोशूट चर्चेचा विषय बनला आहे. गुपचूप लग्न केलं असल्याची देखील चर्चा रंगत आहेत. आता केलेल्या फोटोशूटमध्ये दोघांनी पारंपरिक कपडे घातले आहेत.सध्या त्यांचे हे फोटो व्हायरल होत आहेत. नुसरत जहाँ सध्या यशदास गुप्तासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आल्या आहेत. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुसरत रुग्णालयात होत्या तेव्हा यशदास गुप्ता त्यांच्यासोबत कायम होते.

2019 मध्ये नुसरत यांनी व्यावसायिक निखिल जैनशी लग्न केलं होतं. ज्यानंतर विशेष विवाह कायद्या अंतर्गत हे नातं वैध नसल्याचा मुद्दा त्यांनी प्रकाशात आणला. आम्ही केव्हाच विभक्त झालो होतो.

पण, मी त्याबाबत वाच्यता केली नव्हती. मला खासगी आयुष्यातील गोष्टी अशा उघडकीस आणायला आवडत नाहीत, असं त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान, नुसरत यांचे सर्व आरोप त्यांच्या पतीकडून फेटाळण्यात आले होते.

Romantic photoshoot of Trinamool MP Nusrat Jahan with boyfriend after leaving her husband

महत्त्वाच्या बातम्या