विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेला जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी धार्मिक रंग दिला आहे.आर्यनच्या आडनावामुळे त्याला अटक झाल्याचे म्हटले आहे. मात्र यावरून मेहबुबा यांच्यावर संताप व्यक्त होत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.Religious colors from Mehbooba Mufti on Aryan Khan’s arrest,
आतापर्यत सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय स्तरांतून या घटनेला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. त्यात आता काही राजकीय नेत्यांनी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. जम्मु काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी शाहरुखला पाठींबा देत आर्यन खानवर करण्यात आलेल्या कारवाईमागे त्याचे आडनाव हा एक महत्वाचा मुद्दा आहे.
यावरून मेहबुबा मुफ्ती यांच्यावर गुन्हा दाखल करावा,अशी मागणी तक्रारदार वकीलानं केली आहे. जाणीवपूर्वक एका विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केले जात आहे. एका राजकीय पक्षाची ही मतांसाठीची खेळी आहे. असेही त्यांनी म्हटलं आहे.
मुफ्ती यांच्यावर दोन समुहांमध्ये वाद आणि तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केला गेली आहे. याप्रकरणावर एका दिल्लीतील वकीलानं मुफ्ती यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराने म्हटले आहे की, जम्मु काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केलेलं वक्तव्य खेदजनक आहे. त्यामुळे दोन समुहांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते. मुफ्ती यांनी एका राजकीय पक्षानं आपल्या स्वार्थासाठी अशाप्रकारे कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
त्यासाठी एका विशिष्ट समुहाच्या लोकांना लक्ष्य केलं जात असल्याचे म्हटले आहे.काही दिवसांपासून शाहरुख आणि आर्यन खान चर्चेत आले आहे. आर्यन खानला एनसीबीनं अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App