आपला महाराष्ट्र

१२ हजार पानांचे पुरावे, वर्षभराचा पाठपुरावा अन् अखेर FIR! आता रोहित पवारांचा पुढचा निशाणा कोण?

नवी मुंबईतील कथित ५ हजार कोटी रुपयांच्या जमीन प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरले आहे. या प्रकरणात बिवलकर कुटुंबातील गंगाधर बिवलकर आणि यशवंत बिवलकर यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे.

Manoj Jarange

आरक्षणासाठी आरपारची लढाई! २९ ऑगस्टपासून उपोषण, जरांगेंचा मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

झिशान सिद्दीकींना पाकिस्तानातून धमकी! मुंबई पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार झिशान सिद्दिकी यांना पाकिस्तानकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या धमक्यांचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी, त्यांना पाठवलेल्या एका ऑडिओ संदेशातील आवाज फरार गुंड झीशान अख्तरचा असल्याचे ओळखले आहे.

डेटा सेंटरला विरोध का? गणेश नाईकांचा मोठा खुलासा; TDR वादावरही थेट निशाणा

ठाण्यात भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. कथित TDR प्रकरणावरून वनमंत्री तथा भाजप नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, गणेश नाईक यांनी ठाण्यातील विकासकामांवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मोदींच्या भेटीमागे राजकीय संकेत? युगेंद्र पवारांनी केला खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना युवा नेते युगेंद्र पवार यांनी सूचक उत्तर देत विराम देण्याचा प्रयत्न केला. “आमचा पक्ष भाजपसोबत जाणार का, हे आता पवार साहेबांनाच विचारले पाहिजे.

OLA-Uber-Rapido चालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम; परिवहन विभागाचे 8 मोठे निर्णय

ओला, उबेर आणि रॅपिडोसह ॲप-आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांवर आता परिवहन विभागाची अधिक कडक नजर राहणार आहे.

तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईचं फडणवीसांकडून कौतुक; म्हणाले, ‘अशीच कारवाई पुढेही सुरू राहील’

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ, नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक उत्पादने तसेच अस्वच्छता आढळणाऱ्या हॉटेल्स, डेअरी आणि दुकानांवर सातत्याने कारवाई सुरू केली आहे.

सत्येंद्र जैन पुन्हा अटकेत! दिल्ली जल बोर्ड टेंडर प्रकरणात ACBचा मोठा दणका

दिल्ली जल बोर्डाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या नूतनीकरण आणि क्षमता वाढीच्या निविदांमधील कथित गैरव्यवहारप्रकरणी दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना अटक केली आहे.

मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची MMC नोंदणी थांबवली; कोर्टाच्या निकालापर्यंत ‘नो एंट्री’

राज्यातील बीएचएमएस डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

Tukaram Mundhe

उशीर झाला, पण आता माफी नाही! तुकाराम मुंढेंचा थेट इशारा; कारवाई सुरूच राहणार

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पश्चिम मुंबईची कनेक्टिव्हिटी बदलणार! मीरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रोला हिरवा कंदील

गर्दीमुळे रेल्वे प्रवासाच्या यातना सहन करणाऱ्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा मिरा-भाईंदर ते वसई-विरार दरम्यानचा आता सुखद आणि गारेगार होणार आहे.

Dabholkar case

13 वर्षांनंतर दाभोलकर प्रकरणात मोठा धक्का; सचिन अंदुरे बाहेर येणार, जन्मठेपेला हायकोर्टाची स्थगिती

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय दिला.

हिंजवडीतील 15 लाख रोजगार धोक्यात, कंपन्या महाराष्ट्राबाहेर जाण्याच्या तयारीत असल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा

राज्यातील विविध शहरांच्या आणि जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी चाकणनंतर पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कची पाहणी केली.

Vinod Tawde

तावडेंना भाजपने दिली ‘मोठी’ जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या राजकारणात आता महाराष्ट्रातील या नेत्याची एन्ट्री!

पुढच्या वर्षी निवडणुका असलेल्या उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती करून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचे माजी मंत्री विनाेद तावडे यांच्यावर माेठी जबाबदारी साेपवली आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.

मोदी बारामतीत येणार, पवारांच्या ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन; नवरात्रात राजकीय समीकरणांना नवा ट्विस्ट?

बारामती विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 16 ऑक्टोबर रोजी करण्याचे नियोजन असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्यानंतर बारामतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

‘मुलाचे नाव सीडीआरमध्ये आढळले तर स्वतः पोलिसांच्या हवाली करेन’; विलास घुले हत्या प्रकरणी बजरंग सोनवणेंचे खुले आव्हान

केज तालुक्यात २० जून रोजी झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणावरून बीडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात आपल्या मुलाचे नाव जोडले जात असल्याच्या आरोपांवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

गणेशोत्सवाला जागतिक वारसा दर्जासाठी राज्य सरकारची मोठी मोहीम; ४८० मंडळांना दीड कोटींची बक्षिसे

महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहे. गणेशोत्सवाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा

९८% अनुपालन तरीही परवाना निलंबित! कोर्टाचा एफडीएला दणका; मिठाई व्यावसायिकाला ५ लाखांची भरपाई

पुनर्तपासणीत ९८ टक्के अन्न सुरक्षा नियमांचे पालन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही परवाना निलंबित ठेवल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला (FDA) चांगलाच दणका दिला आहे.

सातवा वेतन आयोग आणि थकीत देणी मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी १८ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. वेतन करार, सातवा वेतन आयोग, महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी यांसह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

Vishwajit Kadam

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवापूर्वी पुणे खड्डेमुक्त होणार? विश्वजित कदमांची आयुक्तांकडे धाव; ‘या’ मागण्यांचा पाढा

गणेशोत्सव तोंडावर आला असताना पुणे शहरातील रस्ते, वाहतूक आणि नागरी सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स संपला; गिरीश महाजनांची अधिकृत नियुक्ती, भुजबळ-भुसे वेटिंगवर!

नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्य शासनाने नाशिकच्या पालकमंत्रिपदाची अधिकृत घोषणा केली

OBC नेता नवनाथ वाघमारेंच्या वक्तव्याने वाद पेटला; मराठा महिलांचा संताप, कारवाईची मागणी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलेले असतानाच ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. ओबीसी नेत्यांच्या कुटुंबातील विवाहसंबंधांचा उल्लेख करत त्यांनी मराठा समाजातील तरुणींविषयी केलेल्या वक्तव्यावरून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Maratha Reservation: “सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र शक्य नाही”; रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. “मराठा समाजाला आरक्षण द्यावे

चाकण-तळेगावची कोंडी सुटणार? शिंदेंनी दिली ‘सहा महिन्यांची’ डेडलाइन

चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर आता ‘फास्ट ट्रॅक’ पद्धतीने काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

‘आजपासून मुंब्रा म्हणायचं नाही…’; नितेश राणेंच्या एका विधानाने राजकारण तापलं

मुंब्राच्या नामांतराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंब्राला ‘मुंब्रादेवी’ असे संबोधण्याचे आवाहन केले आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात