विशेष प्रतिनिधी
बारामती : कौटुंबिक नाती आणि राजकीय भूमिका या वेगवेगळ्या असतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत निर्णय प्रमुख मंडळी घेतील, अशी भूमिका राजेंद्र पवार यांनी मांडली.
बारामती येथे रविवारी (ता. ८) माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, रोहित यांनी स्वीकारलेली राजकीय भूमिका आणि त्यानुसार ते करत असलेले काम योग्य आहे. दुष्काळ पडला असताना लोकांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे.
आमदार म्हणून हे त्यांचे कर्तव्य आहे. या दौऱ्याचा त्यांना आताही उपयोग होईल. भविष्यात त्यांच्या पक्षाला सत्ता मिळाली, तर लोकांच्या अडचणी नेमक्या काय आहेत आणि त्यातून मार्ग कसा काढता येईल, यासाठीही या अनुभवाचा फायदा होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत नेमके काय सुरू आहे, याची मला माहिती नाही. पवार साहेब रुग्णालयात असताना दहा तारखेनंतर विलीनीकरण होणार असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर आली होती.
मात्र, त्यावर मी व्यक्त होण्यापेक्षा याबाबतचा निर्णय प्रमुख मंडळी घेतील. हा माझा विषय नाही, असे राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले. एन. डी. पाटील यांची पक्षीय भूमिका वेगळी होती; मात्र नातेवाईक म्हणून त्यांचे पवार कुटुंबाशी अत्यंत जवळचे संबंध होते. राजकीय मतभेद आणि कौटुंबिक जवळीक या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, असेही यावेळी राजेंद्र पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App