श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजित ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप
विशेष प्रतिनिधी
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजित 41 व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा (मुख्यमंत्री चषक) समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रांत पाटील, आमदार शंकर जगताप, मनपा आयुक्त नवल किशोर राम, क्रिडा आयुक्त दीपक सांगला, बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव सुबिंदर सिंह गिल, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या क्रीडा परिसंस्थेमध्ये बालेवाडी येथील क्रीडा संकुल महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘खेलो इंडिया’ स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करून पदके मिळवत आहेत. राज्य शासनाने ‘मिशन लक्ष्यवेध’च्या माध्यमातून विविध खेळांसाठी उत्कृष्ट प्रशिक्षण देणारी केंद्रे सुरू केली आहेत. बास्केटबॉल हा महाराष्ट्रातील लोकप्रिय खेळ असून, राज्याने देशाला अनेक दर्जेदार खेळाडू दिले आहेत. अशा राष्ट्रीय स्पर्धांमुळे खेळाडूंना अनुभव आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळते. महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेने या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले, यावेळी भारताने ४८ पदके मिळविली. विशेष म्हणजे १७ राज्यांतील खेळाडूंनी पदकांची कमाई केली. कबड्डी, नेमबाजी आणि तिरंदाजीसारख्या खेळांत सामान्य कुटुंबांतील खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळविले. खेळाडूंची परिस्थिती नव्हे, तर त्यांची जिद्द, मेहनत आणि खेळाप्रती असलेली निष्ठा महत्त्वाची असते.
सर्व विजेत्या आणि सहभागी संघांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्राचा संघ यंदा अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नसला, तरी त्यातून निराश होण्याचे कारण नाही. खेळात जय-पराजय होत असतो. पुढील स्पर्धेत अधिक चांगली कामगिरी करण्याची संधी खेळाडूंना मिळेल. खेळाडूंमध्ये जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि खिलाडूवृत्ती असणे महत्त्वाचे असून, पराभवानंतरही न थांबता प्रयत्न करणारे खेळाडूच भविष्यात विजयाचे मानकरी ठरतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध राज्यांतील संघांमधून भारताचे वैविध्य आणि एकात्मतेचे दर्शन घडते. दक्षिण आणि उत्तर भारतातील राज्यांचे खेळाडू एकत्र येऊन देशाच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढवत आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
कुलविंदर सिंग गिल म्हणाले, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या माध्यमातून राज्यातील मुलांच्या आणि मुलींच्या संघांची राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी सातत्याने उंचावत असून, खेळाडू राष्ट्रीय पदकांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात येत असलेल्या बास्केटबॉल स्टेडियममध्ये आगामी काळात राष्ट्रीय स्पर्धेबरोबरच आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचेही आयोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App