अमित शहांची 150 जिल्हाधिकाऱ्यांशी कथित बातचीत; डिटेल्स शेअर करण्यासाठी जयराम रमेश यांना निवडणूक आयोगाची नोटीस!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मावळचे गृहमंत्री अमित शाह यांनी नोकरशाही मार्फत निवडणूक प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ करण्यासाठी देशातल्या तब्बल 150 जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत केल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी केला होता. त्या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले होते.

ECISVEEP serves notice to Jairam_Ramesh over his comment that AmitShah had called 150 DMs and collectors for counting day.

निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांच्या पत्राची ताबडतोब दखल घेऊन संबंधित बातचीतीचे डिटेल्स शेअर करा, अशी नोटीस जयराम रमेश यांना पाठवली. या नोटिशीमध्ये निवडणूक आयोगाने 2 जून 2024 सायंकाळी 6.00 पर्यंतची मुदत दिली होती. परंतु तोपर्यंत जयराम रमेश यांनी अमित शाह आणि 150 जिल्हाधिकारी यांच्या बातचीतीचे कोणतेही डिटेल्स निवडणूक आयोगाला शेअर केले नव्हते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मावळते पंतप्रधान आहेत, तसेच अमित शाह हे देखील मावळते गृहमंत्री आहेत. पण त्यांनी निवडणूक मतमोजणीच्या प्रक्रियेत ढवळाढवळ करण्यासाठी देशातल्या 150 जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत केली. हे घटनाबाह्य कृत्य आहे. याची दखल घेऊन ताबडतोब गृहमंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाला लिहिले होते.

जयराम रमेश यांच्या पत्राची निवडणूक आयोगाने ताबडतोब दाखल घेतली. जयराम रमेश यांना पत्राचे उत्तर पाठविले. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना देशातले सर्व वरिष्ठ अधिकारी निवडणूक आयोगाला उत्तरदायी असतात. ते थेट निवडणूक आयोगाकडे रिपोर्टिंग करतात. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या बातचीतीचे डिटेल्स आपण निवडणूक आयोगाला शेअर करावेत, जेणेकरून पुढची कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाला पावले उचलता येतील, असे निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांना पाठविलेल्या पत्रोत्तरात नमूद केले.

निवडणूक आयोगाच्या या नोटीशीनुसार जयराम रमेश यांनी 2 जून 2024 रोजीच म्हणजे आजच सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत अमित शाह आणि 150 जिल्हाधिकारी यांच्या बातचीती संदर्भातले जेवढे तपशील त्यांच्याकडे उपलब्ध होते, ते निवडणूक आयोगाला शेअर करणे अपेक्षित होते. परंतु जयराम रमेश यांनी दिलेल्या मुदतीत तरी ते डिटेल्स निवडणूक आयोगाला शेअर केल्याची बातमी आली नव्हती.

ECISVEEP serves notice to Jairam_Ramesh over his comment that AmitShah had called 150 DMs and collectors for counting day.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात