2024 Exit Poll : नेहरूंच्या हॅटट्रिकची बरोबरी करण्यासाठी मोदींना पूर्व + उत्तर + दक्षिण भारतातून मोठी रसद!!

East, north and south India supports PM Modi for the third term like Nehru

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असा अंदाज मतदान झाल्यानंतर जाहीर झालेल्या विविध एक्झिट पोलच्या मधून व्यक्त करण्यात आला आहे. पण या एक्झिट पोलचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लोकसभा निवडणुकीतील यशाची बरोबरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्व + उत्तर + दक्षिण भारतातून जनमताच्या कौलाची प्रचंड मोठी रसद मिळाली आहे. अर्थात पश्चिम भारतही यात पिछाडीवर राहिलेला नाही. East, north and south India supports PM Modi for the third term like Nehru

देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार येणार असल्याचा अनेक एक्झिट पोलचा निष्कर्ष आहे. त्याच बरोबर “इंडी” आघाडीचे सर्व दावे एक्झिट पोलनी फोल ठरविले आहेत. अधिक तर राज्यांत भाजपची कामगिरी दमदार झाल्याची दिसली आहे.

काही एक्झिट पोलनी भाजपला ३५० हून अधिक जागा मिळणार असल्याचे म्हटले आहे. भाजपला सर्वाधिक फायदा दक्षिण भारतात झाल्याचे दिसत आहे. केरळपासून तेलंगणापर्यंत भाजपच्या जागा वाढल्याचे एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला तृणमूल काँग्रेस पेक्षा अधिक जागा मिळत असल्याचा अंदाज आहे. राजधानी नवी दिल्लीत भाजपने क्लीन स्विप केल्याचा अंदाज आहे.

टाइम्स नाऊ नवभारत ईटीजी

या सर्व्हेनुसार एनडीएला ३५८ जागा, इंडिया आघाडीला १३२ जागा तर अन्य पक्षांना ५३ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एबीपी- सी व्होटर

या एक्झिट पोलनुसार एनडीएला ३५३ ते ३८३ जागा, इंडिया आघाडीला १५२-१८२ जागा तर अन्यला ४ ते १२ जागा मिळण्याची शक्यता आहे.

एक्सिस माय इंडिया

आजतक-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजप आघाडीला ४०० पेक्षा अधिक जागा मिळू शकतील. या सर्व्हेनुसार भाजप ३६१ ते ४०१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. “इंडी” आघाडीला १३१ ते १६६ जागा मिळतील.


एक्झिट पोल डिबेट वरचा काँग्रेसचा बहिष्कार मागे; आता डिबेट मध्ये भाग घेऊन भाजपला करणार “एक्स्पोज”!!


Matrize

एनडीएला ३५३ ते ३६८ जागा मिळतील, तर इंडी आघाडीला ११८ ते १३३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अन्य पक्षांना ४३ ते ४८ जागा मिळतील असा अंदाज Matrizeने वर्तविला आहे.

*PMARQ*च्या

एक्झिट पोलनुसार देशात एनडीएला ३५९ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर “इंडी” आघाडीला १५४ जागा मिळतील. अन्यला ३ जागा मिळतील असा अंदाज आहे.

जन की बातच्या

एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला ३७७, “इंडी” आघाडीला १५१ तर अन्यला १५ जागा मिळण्याची शक्यता आहे.

D-Dynamics

च्या एक्झिट पोलनुसार NDA आघाडीला देशात ३७१ तर इंडिया आघाडीला १२५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अन्य पक्षांना ४७ जागा मिळतील असे म्हटले आहे.

नॅशनल न्यूजने

भाजप आणि मित्र पक्षांना ३४२ ते ३७८ जागा मिळण्याचा अंदाज दिला आहे. “इंडी” आघाडीला १५३ ते १६९ जागा मिळतील तर अन्यला २१ ते २३ जागा मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.

East, north and south India supports PM Modi for the third term like Nehru

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात