पुणे पोर्शे अपघात प्रकरण : ‘गाडी चालवताना खूप नशेत होतो,’ अल्पवयीन आरोपीने दिली कबुली!

आरोपीच्या आई-वडिलास ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. Pune Porsche accident case I was very drunk while driving makes heartfelt confession of minor accused

विशेष प्रतिनिधी

पुणे  : पुणे पोर्शे कार अपघाताच्या घटनेत नवा ट्विस्ट आला आहे. आपल्या आलिशान पोर्शे कारने दोन जणांना धडक देणाऱ्या १७ वर्षीय तरुणाने अपघाताच्या वेळी गाडी चालवताना दारूच्या नशेत असल्याची कबुली पुणे पोलिसांकडे दिली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. पोलिस सूत्रांचा हवाला देत इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटले आहे की, चौकशीदरम्यान किशोरने अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याला सर्व घटना पूर्णपणे आठवत नाहीत.

दरम्यान, पुणे न्यायालयाने रविवारी पुरावे नष्ट केल्याप्रकरणी १७ वर्षीय मुलाची आई शिवानी अगरवाल आणि विशाल अगरवाल यांना ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यावर रक्ताच्या नमुन्याशी छेडछाड केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरात 19 मे रोजी झालेल्या कार अपघातानंतर अल्पवयीन मुलाचे रक्त नमुने बदलण्यात त्यांच्या कथित भूमिकेबद्दल या दोघांची चौकशी सुरू आहे. या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला.

अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल हिला 1 जून रोजी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. दरम्यान, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोपीचे वडील विशाल अगरवाल यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या पालकांना पुणे न्यायालयात हजर केले आणि त्यांच्या कोठडीची विनंती केली. दोघांनाही ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Pune Porsche accident case I was very drunk while driving makes heartfelt confession of minor accused

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात