विशेष प्रतिनिधी
दिल्ली : कोरोणाची पहिली लाट आली. दुसरी लाट आली. या दोन्ही लाटांमध्ये बरेच व्यक्ती दगावले. लोकांचे खूप हाल झाले, हे आपण सर्वांनीच पाहिले आहेच. ऑक्सिजनच्या अभावी हॉस्पिटलच्या दारात लोकांनी आपला जीव सोडला, जीव सोडलेल्या व्यक्तींचे मृतदेह रस्त्यावर पडून होते, स्मशानामध्ये मृतदेह जाळण्यासाठी देखील जागा नव्हती.
60% of the ventilators provided by the central government were not working, knowingly central goverment supplied bad goods to states in power other than the BJP ; Shivsena MP Vinayak Raut
मागील जवळपास दीड वर्षापासून कोरोणाने अख्ख्या जगभर आपल्या प्रस्थ निर्माण केले आहे. या व्हायरसचे नवनवीन व्हेरिअंट्स येत आहेत. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पाश्र्वभूमीवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारकडून करण्यात आलेला वस्तू पुरवठा आणि निधी याबाबत टीका केली आहे. भाजपव्यतिरिक्त सत्ता असणाऱ्या राज्यांना जाणून बुजून खराब वस्तूंचा पुरवठा करण्यात आला होता, असे त्यांनी म्हटले आहे.
मोदी लाटेत निवडून आलेल्या विनायक राऊतचा २०२४ ला बंदोबस्त करू, निलेश राणे यांचा इशारा
पुढे ते असेही म्हणतात की, महाराष्ट्र सरकारला पाठवण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्स पैकी जवळपास 60 टक्के व्हेंटिलेटर्स हे खराब होते. आणि हे खराब व्हेंटिलेटर्स अतिशय वाईट अवस्थेमध्ये होते. दुरूस्त करण्यासाठी टेक्निशियन देखील मिळत न्हवते. त्यावेळी नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. असे त्यांनी म्हटले आहे.
देशात कोणाची साथ सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच संसदेत कोरोणाच्या हाताळणी विषयी चर्चा होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more