कोरोना संसर्गाची माहिती लपविल्याबद्दल ॲमेझॉन कंपनीला पाच लाख डॉलरचा दंड


वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये पसरलेल्या संसर्गाबाबत इतर कर्मचाऱ्यांना आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती न पुरविल्याबद्दल कॅलिफोर्निया प्रशासनाने ॲमेझॉन कंपनीला पाच लाख डॉलरचा दंड ठोठावला आहे. कॅलिफोर्नियामध्ये ‘ॲमेझॉन’चे दीड लाख कर्मचारी काम करतात. यातील बहुतेक कर्मचारी त्यांच्या शंभर गोदामात काम करतात. Amezon punished by5 lakh doller

या ठिकाणी त्यांना मिळालेल्या सर्व ऑर्डरचे पॅकिंग होते आणि त्या नियोजित ठिकाणी पाठविल्या जातात. कामाच्या ठिकाणी कोरोना संसर्गाचे प्रकरण आढळल्यास इतर कर्मचाऱ्यांना आणि सरकारी आरोग्य अधिकाऱ्यांना एका दिवसाच्या आत कळविणे कंपन्यांना अथवा संस्थांना बंधनकारक आहे.कंपनीने अशा प्रकारची माहिती अद्ययावत ठेवली नाही, अशी तक्रार झाली होती. कॅलिफोर्नियामध्ये नव्यानेच झालेल्या कोविड माहिती हक्क कायद्याअंतर्गत प्रशासनाने कारवाई करत कंपनीला दंड ठोठावला. कंपनीने चूक कबुल करताना दंड भरण्याची तयारी दर्शविली असून आरोग्य यंत्रणा सुधारण्याचीही हमी दिली आहे.

Amezon punished by5 lakh doller

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था