वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात पावसाची मुसळधार बॅटींग सुरु आहे. दुसरीकडे ‘जोवाड’ नावाचं चक्रिवादळ घोंगवत आहे, असा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे अस्मानी संकटांचा सामना करण्यासाठी जनतेला आता तयार रहावे लागणार आहे. ‘Jowad’ cyclone hovering over the state; Due to untimely loss of crops
ऐन थंडीत महाराष्ट्रातील पुण्यासह अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आधी थंडी त्यात पाऊस,अशी परिस्थिती आहे. आता ‘जोवाड’ चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. वादळ आणि हवामानातील बदलांमुळे राज्यातील अनेक भागांत पुन्हा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वाढली आहे.
आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. ३ डिसेंबरपर्यंत त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल आणि ते उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकेल, असाही अंदाज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App