काँग्रेसच्या शिडातून हवा काढून इतर विरोधकांच्या शिडात पुरती हवा भरली जाईल…??


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत सिल्वर ओकच्या पोर्चमध्ये उभे राहून संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएचे राजकीय अस्तित्व पुसून टाकले. त्यांनी एक प्रकारे काँग्रेसच्या हायकमांडच्या शिडातून हवा काढून घेतली. सहा महिन्यांपूर्वी आपल्याला यूपीएचे अध्यक्षपद मिळू दिले नाही म्हणून पवारांनी काँग्रेसच्या हायकमांडवर ममतांच्या मुखातून राजकीय बदला घेत घेतला.Can Mamata and Pawar gather enough political power by ditching congress at the national level??

पण कितीही झाले तरी काँग्रेसच्या शिडातून हवा काढून घेऊन इतर विरोधकांच्या राजकीय शिडामध्ये पुरेशी हवा भरली जाईल का…?? हा खरा प्रश्न आहे आणि भारतीय राजकारणाच्या दृष्टीने तोच सर्वांत कळीचा प्रश्न आहे…!!



ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे अस्तित्व कितीही शून्यवत केले असले, त्या प्रत्येक राज्यांमध्ये जाऊन काँग्रेस फोडत असल्या तरी देखील एक वस्तुस्थिती नाकारण्यात अजिबात मतलब नाही की काँग्रेस हाच देशव्यापी विरोधी पक्ष आहे. यातला “देशव्यापी” हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. तो शब्द अन्य कोणत्याही प्रादेशिक पक्षाला लागू होत नाही. मग काही प्रादेशिक पक्ष आपापल्या राज्यात कितीही प्रबळ असले तरी…!! देशव्यापी या शब्दावर ते अधिकार सांगू शकत नाहीत. कारण काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर ते मुकाबला करू शकत नाहीत.

हेच वेगळ्या भाषेत बोलायचे झाले तर ममता बॅनर्जी किंवा शरद पवार यांनी काँग्रेसला वगळून सर्व विरोधी पक्षांचे ऐक्य साधण्यासाठीच कितीही प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला तरी देखील त्यांना भारतव्यापी पातळीवर नेमके राजकीय यश किती मिळेल?? हा मूलभूत प्रश्न आहे…

आणि आकडेवारीच्याच हिशेबात बोलायचे झाले तर प्रादेशिक पक्ष आपापल्या राज्यांत कितीही प्रबळ असले तरी लोकसभेच्या विद्यमान संख्याबळानुसार सर्व प्रादेशिक पक्षांचे एकूण संख्याबळ हे 150 पेक्षा अधिक असू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. 150 हा आकडा देखील त्या त्या राज्यांमधल्या राजकीय शक्तीचा परमोच्च आकडा आहे. म्हणजे तेथे प्रादेशिक पक्षांना 100% टक्के यश मिळाले तरच 150 हा आकडा गाठला जातो.

अन्यथा यामध्ये काँग्रेस किंवा भाजप यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्षांनी आपल्या मतांच्या टक्केवारी मध्ये दोन ते पाच टक्क्यांनी जरी वाढ केली तरी प्रादेशिक पक्षांचा 150 हा आकडा गडबडून एकदम 100 च्या खाली येऊ शकतो आणि इथेच काँग्रेस नावाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षाचे खरे राजकीय महत्त्व आहे…!!

त्याच बरोबर ममता बॅनर्जी असोत किंवा शरद पवार असोत यांची प्रादेशिक ताकदकाँग्रेसपेक्षा सध्या निश्चित जास्त आहे हे मान्य करावे लागेल. पण तरीही आपापल्या प्रदेशांना सोडून खऱ्या अर्थाने त्यांची राजकीय ताकद किती?, हे निदान शरद पवार यांच्या बाबतीत तरी सिद्ध झाले आहे. ती ताकद शून्य आहे. ममता बॅनर्जी यांची ताकद सिद्ध व्हायची आहे. कारण त्यांची राष्ट्रीय पातळीवरची महत्त्वाकांक्षा नुकतीच कुठे फुललेली दिसत आहे.

पवारांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा गेली तीस वर्षे नुसतीच “फुलली” आहे ती कधीच “फळली” नाही…!! कारण त्यांची तेवढी ताकदच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांनी केलेला प्रयोग महाराष्ट्रात मर्यादित अर्थाने यशस्वी झाला पण राष्ट्रीय पातळीवर पूर्ण अपयशी ठरला ही वस्तुस्थिती खुद्द त्यांनाही नाकारता येणार नाही.

ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत मात्र राष्ट्रीय पातळीवर असे त्यांचे कर्तृत्व खऱ्या अर्थाने अद्याप सिद्ध व्हायचे आहे. त्यामुळे त्यांना संशयाचा फायदा देता येऊ शकतो. तरी देखील भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांच्या विरोधात त्यांनी देशपातळीवर कितीही मोठी हवा निर्माण केली तरी तेवढी खऱ्या अर्थाने राजकीय ताकद निर्माण करता येईल का?, हा त्यांच्या राजकीय यशाच्या दृष्टीने मोजमापाचा कळीचा प्रश्न ठरणार आहे…!!

आणि म्हणूनच काँग्रेसच्या शिडातून हवा काढून घेऊन इतर विरोधी पक्षांच्या शिडात तेवढी हवा भरता येणे फार कठीण आहे…!! कारण त्यासाठी हवे पलिकडे जाऊन मजबूत संघटना उभी करावी लागते. ती उभी करण्याची ताकद पवारांकडे नाही. ममतांकडे आहे… पण त्यासाठी भरपूर वेळ लागेल. तो देण्याची ममतांची सिद्धता आहे…??

Can Mamata and Pawar gather enough political power by ditching congress at the national level??

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात