एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरूच ; अनिल परब यांनी दिली महत्वाची माहिती


वेतनवाढीनंतर मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. परंतु बरेच कर्मचारी विलीनीकरण मागणीवर ठाम आहेत.Suspension action against ST employees continues; Important information given by Anil Parab


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एसटी संपाचा तिढा दिवसेंदिवस वाढत आहे. विलीनीकरण मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील एक महिन्यापासून आंदोलन करत आहेत. दरम्यान राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे.वेतनवाढीनंतर मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. परंतु बरेच कर्मचारी विलीनीकरण मागणीवर ठाम आहेत.

सरकारने हा संप कर्मचाऱ्यांनी मागे घ्यावा म्हणून काही कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते.दरम्यान एसटी संपातील कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेतल्यानंतरही अनेक कर्मचारी पुन्हा संपात सहभागी होत आहेत.अशा निलंबित कर्मचाऱ्यांवरील कारवाईची पुढील प्रक्रिया सुरूच राहणार आहे, असे परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले.



संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण ते कर्मचारी कामावर रुजू झाल्यास त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल, असा आदेश राज्य सरकारने दिला होता.

अनेक कर्मचारी निलंबनाचा गैरफायदा घेत आहेत. कर्मचारी निलंबन मागे घेतल्यानंतर वेगवेगळी कारणे देऊन संपात सहभागी होत आहेत. त्यामुळे अशा निलंबित कर्मचाऱ्यांवरील कारवाईची पुढील प्रक्रिया सुरूच ठेवण्यात येईल.

Suspension action against ST employees continues; Important information given by Anil Parab

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात