विशेष प्रतिनिधी
मुबंई : स्वप्नील जोशी, पूजा सावंत, समर्थ जाधव यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या बळी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. लपाछपी फेम दिग्दर्शक विशाल फुरिया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. थ्रिलर, सस्पेन्स, हॉरर या कॅटेगरी मधील सिनेमे आवडणाऱ्या लोकांसाठी बळी हा एक उत्कृष्ट सिनेमा असणार आहे. अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
The trailer of the movie Bali starring Swapnil Joshi and Pooja Sawant has been released
या सिनेमामध्ये स्वप्नील जोशीला एक मुलगा आहे. त्याची बायको वारली आहे. तिचे नाव एलिझाबेथ असते(?) असे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. एके दिवशी त्याच्या मुलाला चक्कर येते. म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले जाते. तिथे त्याच्या मुलाला आणखी एक मुलगा भेटतो. ज्याला एलिझाबेत नावाची एक बाई दिसत असते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा भासाचा आजार एक संसर्गजन्य आजार आहे. जो प्रत्येक लहान मुलांमध्ये पसरत असतो. आताही ही एलिझाबेथ नक्की कोण? तिचा या मुलांसोबत काय संबंध? हे चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे.
नुसरत भरुचा हिची प्रमुख भूमिका असलेल्या छोरी सिनेमाच्या टीजरने अपेक्षा वाढवल्या
लपाछपी हा मराठी चित्रपट सृष्टीमधील आजवरचा सर्वोत्कृष्ट हॉरर सिनेमा होता. या सिनेमाचा हिंदी रिमेक छोरी हा सध्या अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. नुसरत भरुचा हिने या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तर लपाछपी या सिनेमात पूजा सावंतने ही भूमिका अतिशय उत्कृष्टरीत्या साकारली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more