महात्मा जोतिबा फुले आणि अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब द्यावा ; रामदास आठवले


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : महात्मा ज्योतिबा फुले यांना स्त्री शिक्षणाचे प्रणेते, महापुरुष म्हणून ओळखले जाते. स्त्री शिक्षण, दलितांचे शिक्षण, दलित आणि स्त्रियांचे मानवी हक्क तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी केलेले काम युगप्रवर्तकच होते. या महापुरुषांच्या विचारामुळे समाजाला एका वेगळ्या दिशेने आणि प्रगतीच्या दिशेने जाण्याची ओढ लागली, दिशा मिळाली. त्यामुळे महात्मा फुले यांच्या युगप्रवर्तक कार्याचा भारतरत्न किताब देऊन गौरव करण्यात यावा याबाबतचे पत्र मंत्री केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले आहे.

Posthumous Bharat Ratna should be given to Mahatma Jotiba Phule and Anna Bhau Sathe; Ramdas remembered


नितीन गडकरी, शरद पवार यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट


सोबतच त्यांनी अण्णाभाऊ साठे ज्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये आणि सामाजिक परिवर्तन आधार चळवळीमध्ये अभूतपूर्व योगदान दिले आहे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जागतिक स्तरावर वाचले जाते. त्यांच्या लिखाणाला कलात्मक स्तरावर एक वेगळा मान आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा देखील भारतरत्न किताब देऊन सन्मान करण्यात यावा. अशी मागणी आठवले यांनी अमित शहा यांना पत्राद्वारे केली आहे.

Posthumous Bharat Ratna should be given to Mahatma Jotiba Phule and Anna Bhau Sathe; Ramdas remembered

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात