ममता – पवारांनी काँग्रेसला घेरल्यानंतर कपिल सिब्बल उभे राहिले पक्षाच्या बाजूने!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या राजकीय अस्तित्वावरच ठळक प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर देशभरात राजकीय गदारोळ उठला असताना जी 23 मधील महत्त्वाचे नेते कपिल सिब्बल हे मात्र काँग्रेस नेतृत्वाच्या बाजूने उभे राहिलेले दिसत आहेत.Kapil sibal stands with congress leadership over issue of UPA

ममता आणि पवार यांनी यूपीए राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लावले असले तरी, “काँग्रेस शिवाय यूपीए म्हणजे आत्म्याशिवाय शरीर” ही वेळ खरे विरोधकांचे ऐक्य साधण्याचि आहे, ट्विट कपिल सिब्बल यांनी केले आहे.



त्यामुळे कॉंग्रेसच्या गांधी परिवारातील नेतृत्वाबद्दल अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे कपडे सिब्बल जेव्हा काँग्रेसवर इतर काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांनी तोफा डागल्या तेव्हा ते स्वतः काँग्रेसच्या बाजूने उभे राहिले आहेत. काँग्रेसची मतांची टक्केवारी देशभरात 20 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. तृणमूळ काँग्रेसची मते देशभराच्या तुलनेत फक्त चार टक्के आहेत. अशा स्थितीत काँग्रेसला वगळून विरोधकांची आघाडी करता येणे तरी शक्य आहे का?, असा सवाल अधीर रंजन चौधरी यांनी देखील केला आहे. त्यालाच एक प्रकारे कपिल सिब्बल यांनी आपल्या ट्विट मधून दुजोरा दिला आहे.

एरवी कपिल सिब्बल हे जरी काँग्रेसच्या नेतृत्वाचे टीकाकार असले तरी काँग्रेसच्या राजकीय दृष्ट्या अडचणीच्या वेळेला ते पक्षाच्या बाजूने उभे राहिल्याने त्यांच्या पक्ष निष्ठेवर आता कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकणार नाही.

Kapil sibal stands with congress leadership over issue of UPA

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात