गांधीनगर नाही तर मुंबईच देशाची आर्थिक राजधानी राहणार ; अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक


विशेष प्रतिनिधी

मुबंई : नवाब मलिक यांनी नुकताच एका पत्रकार परिषदेमध्ये अापले मत मांडले आहे. नवाब मलिक म्हणतात, गांधीनगर ही देशाची आर्थिक राजधानी कधीही होणार नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी होती आणि राहील. मुंबईमध्ये बरेच मोठमोठे राजकारणी आले पण कोणीही महाराष्ट्रातील व्यापार पळवण्याचे काम केले नाही असे ते म्हणाले.

Mumbai will be the financial capital of the country, not Gandhinagar; Minority Minister Nawab Malik

पुढे ते म्हणतात की, मोदी सरकार सत्तेत येऊन सात वर्ष झालेली आहेत. उद्योग आस्थापन मुंबईमध्ये न होता गुजरातच्या गांधीनगरमध्ये कसे होतील? असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला आहे. नरेंद्र मोदी यांचे आदेश आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला होकार यामुळे महाराष्ट्राचे बरेच मोठे नुकसान झालेले आहे, त्यामुळे जे लोक बोट दाखवत आहेत त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे. असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.


NAWAB MALIK PRESS : नवाब मलिक कोणता गौप्यस्फोट करणार?मोठी स्क्रीन-कुर्ल्यात जय्यत तयारी ; आज घेणार पत्रकार परिषद


भाजप विरोधकांना एकत्र आणण्याच्या मुद्द्यावरून ते म्हणतात की, शरद पवार हे चाणक्य आहेत. हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी भाजप विरोधी मोट बांधण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे. याची चिंता भाजपला लागली आहे. परंतु आजही भाजप आमच्यात कशी फूट पडेल हे बघत आहेत. मात्र त्यांनी गोव्यामधील लक्ष द्यावे, आमची चिंता करू नये. असे देखील मलिक यांनी सांगितले आहे.

Mumbai will be the financial capital of the country, not Gandhinagar; Minority Minister Nawab Malik

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात