NAWAB MALIK PRESS : नवाब मलिक कोणता गौप्यस्फोट करणार?मोठी स्क्रीन-कुर्ल्यात जय्यत तयारी ; आज घेणार पत्रकार परिषद


आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आज आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा सुरू आहे. NAWAB MALIK PRESS: What secret blast will Nawab Malik carry out? Press conference to be held today


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत आर्यन खान प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित सुनील पाटील याचा संबंध असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला. त्यानंतर आता आज सकाळी नवाब मलिक पत्रकार परिषदेत कोणता गौप्यस्फोट करणार आहेत, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.दरम्यान या पत्रकार परिषदेसाठी कुर्ल्यात जय्यत तयारी करण्यात आली असून मोठी स्क्रीन देखील लावण्यात आली आहे. त्यामुळे आज मलिक कोणता बॉम्ब फोडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वीच नवाब मलिक यांनी रविवारच्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती उघड करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनीही मलिक यांच्याविरोधात आरोप सुरू केले. भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले. त्यावर मलिक यांनी मोहित कंबोज हे समीर वानखेडे यांच्या आर्मीचा सदस्य असून पत्रकार परिषदेत खोटे आरोप केले आहेत. मी या प्रकरणी सत्य सर्वांसमोर आणणार असल्याचे मलिक यांनी कंबोजच्या पत्रकार परिषदेनंतर म्हटले.

NAWAB MALIK PRESS : What secret blast will Nawab Malik carry out? Press conference to be held today

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण