अमेरिकेतही झिंगाट? कोलोरॅडो मधील चित्रपट गृहात भारतीयांनी सैराट सिनेमातील झिंगाट गाण्यावर केलेला डान्स पाहिला का?


विशेष प्रतिनिधी

कोलोरॅडो : रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असणारा सैराट हा चित्रपट नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला होता. 2016 साली प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 110 कोटी रुपयांची कमाई केली होती. आजवर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने फक्त भारतातच नव्हे तर अख्ख्या जगभर आपली विजयी घोडदौड चालू ठेवली होती. तर 2016 मध्ये यूएस-मधील कोलोरॅडो येथील एका चित्रपटगृहातील एक व्हिडिओ इंटरनेटवर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

Indians dancing at credit song of sairat film at Colorado, USA. Theatre service at 40 sec is so confused… from india

Zingat in America too? Have you ever seen an Indian dance to a Zingat song from the movie Sarat at a movie theater in Colorado?

नुकताच आपण सलमान खानच्या चाहत्यांनी चित्रपटगृहामध्येच फटाके फोडण्याची बातमी ऐकली आहे. चित्रपट गृहात आपल्या आवडत्या कलाकारावरचे प्रेम व्यक्त करण्याचे हे सर्व प्रकार फक्त भारतातच होतात असे नाही. तर भारतीय जिथे जिथे जातात तिथे तिथे हे प्रकार पाहायला मिळतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा पुन्हा एकदा व्हायरल होणारा व्हिडीओ.


स्वप्नील जोशी, पूजा सावंत ह्यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या बळी चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित


2016 मध्ये हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. त्यानंतर हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतात दिसून येतोय. या व्हिडिओमध्ये मराठी चित्रपट सैराट मोठ्या स्क्रीनवर चालू आहे. यातील झिंगाट हे गाणं चालू आहे आणि भारतीय त्या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहेत. तर एक विदेश स्त्री भारतीय लोकांच्या या डान्सच्या वेडाला आश्चर्याने बघताना दिसून येत आहे.

Zingat in America too? Have you ever seen an Indian dance to a Zingat song from the movie Sarat at a movie theater in Colorado?

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण