अमेरिका, नायजेरियातही ओमिक्रॉन , आफ्रिकेत चोवीस तासात रुग्ण दुप्पटीने वाढले


विशेष प्रतिनिधी

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेत एका दिवसात कोरोनाचे रुग्ण दुपटीने वाढले आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाचे ८५६१ रुग्ण आढळले. तत्पूर्वीच्या चोवीस तासात ही संख्या ४३७३ होती. दरम्यान, अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात बुधवारी ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आला आहे.In the United States, Nigeria, and Omicron, in Africa, patients doubled in twenty-four hours

चोवीस तासात रुग्ण वाढल्याने दक्षिण आफ्रिकेत सरकारवर लसीबाबतचे नियम आणखी कडक करण्याबाबत दबाव वाढला आहे. चोवीस तासात साडेआठ हजार रुग्ण वाढीबरोबरच २८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लस न घेतलेल्या लोकांच्या संचारावर मर्यादा आणाव्यात, असे आरोग्य खात्याने सुचविले आहे.



आधारावर लस न घेतलेल्यांची माहिती गोळा करणे सोपे जाईल, असे खात्याचे म्हणणे आहे.दक्षिण आफ्रिकेच्या तज्ञांनी ओमिक्रॉन संसर्गाला किरकोळ समजणे घाईचे ठरेल, असे म्हटले आहे. ओमिक्रॉनच्या परिणामाबाबत अद्याप निष्कर्ष समोर आलेले नाहीत. सध्या रोगप्रतिकारक शक्ती सक्षम असतानाही तरुण पिढीला ओमिक्रॉनची लागण होत आहे.

त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, मुले आणि आजारी लोकांवर ओमिक्रॉनचा परिणाम कसा होईल याबाबत ठोस सांगता येत नसल्याचे तज्ञ म्हणतात. तसेच पश्चिसम आफ्रिकी देश नायजेरियातही ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. नायजेरिया सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध घातले आहेत.

In the United States, Nigeria, and Omicron, in Africa, patients doubled in twenty-four hours

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात