‘ताकदीच्या बळावर मनमानी चालणार नाही’; शी जिनपिंग यांचा अमेरिकेला अप्रत्यक्ष इशारा

Xi Jinping

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ब्रिक्स समिट २०२६ मध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील समानता, बहुपक्षीयता आणि विकसनशील देशांच्या एकजुटीवर जोर दिला. जगातील कोणताही देश मोठा असो वा छोटा, श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकाला समान सन्मानाचा अधिकार आहे. केवळ ताकदीच्या बळावर एखाद्या देशाने आपले निर्णय इतरांवर लादण्याची पद्धत आता चालणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा जिनपिंग यांनी दिला. Xi Jinping

भारतासोबतचे संबंध सुधारण्याबरोबरच ग्लोबल साउथची भूमिका मजबूत करण्यावरही त्यांनी भर दिला. ब्रिक्स परिषदेचे आयोजन केल्याबद्दल जिनपिंग यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जिनपिंग यांच्या वक्तव्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

‘जगाची स्थिती अस्थिर’

जग सध्या मोठ्या आणि ऐतिहासिक बदलांच्या टप्प्यातून जात आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती अस्थिर असून, त्यात अनेक जोखीम आणि आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत ब्रिक्स देशांनी पुढाकार घेत नेतृत्वाची भूमिका बजावली पाहिजे, असे जिनपिंग यांनी म्हटले.



विकसनशील देशांनी एकजूट होऊन जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या देशांचा वाढता प्रभाव जगाला अधिक बहुध्रुवीय बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही जिनपिंग यांनी नमूद केले.

‘नियम सर्वांसाठी समान असावेत’

आंतरराष्ट्रीय नियम आणि समानतेवर जिनपिंग यांनी विशेष भर दिला. नियमांवर आधारित व्यवस्था नसेल तर जगात अराजकता आणि अव्यवस्था निर्माण होऊ शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नियम एखाद्या एका बलवान देशाने ठरवण्याऐवजी सर्व देशांनी एकत्रितपणे निश्चित केले पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

ताकदीच्या जोरावर आपले निर्णय इतर देशांवर लादण्याची जुनी पद्धत आता स्वीकारली जाऊ नये. विकसनशील देशांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय नियमांचे संरक्षण केले पाहिजे, असेही जिनपिंग यांनी सांगितले.

‘दुहेरी मापदंड नको’

प्रत्येक देशाच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करणे, एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे आणि वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवणे आवश्यक असल्याचे जिनपिंग यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय कायदा सर्व देशांना समानपणे लागू झाला पाहिजे आणि त्यात कोणताही दुहेरी मापदंड असता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

विकसनशील देशांचा आवाज वाढवण्यावर भर

जिनपिंग यांनी संयुक्त राष्ट्रांची भूमिका आणि बहुपक्षीय व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय निर्णयप्रक्रियेत सर्व देशांना समान सहभाग मिळाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

जागतिक व्यापार संघटनेत (WTO) योग्य दिशेने सुधारणा करून निष्पक्ष व्यापार नियमांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच न्यू डेव्हलपमेंट बँकेला पाठबळ देण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेत सुधारणा करून विकसनशील देशांचा आवाज आणि प्रतिनिधित्व वाढवले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“Arbitrary actions based on sheer strength will not prevail”; Xi Jinping’s veiled warning to the US.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात