‘माझा भाऊ दादा गेला अन् विलीनीकरणाची चर्चा संपली’; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, ‘आता मला कंटाळा आलाय!’

विशेष प्रतिनिधी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह विविध नेत्यांकडून यासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी या चर्चांवर स्पष्ट आणि भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझा भाऊ दादा गेला, त्यानंतर विलीनीकरणाच्या चर्चांना आमच्याकडून पूर्णविराम देण्यात आला,’ असे सांगत त्यांनी या विषयावर यापुढे बोलण्यास नकार दिला.

‘या चर्चांचा आता मला कंटाळा आला आहे’

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुम्हाला या चर्चांचा कंटाळा आला नसेल, पण मला आता कंटाळा आला आहे. यापुढे मी या विषयावर बोलणार नाही. दादा आणि आमच्या नेत्यांमध्ये तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विलीनीकरणासंदर्भात चर्चा झाली होती. त्यासाठी तारीखही ठरली होती, हे सत्य आहे.



मात्र, माझा भाऊ दादा गेल्यानंतर या चर्चांना आमच्याकडून पूर्णविराम देण्यात आला. अजित पवार गटाकडून आता काय चर्चा सुरू आहेत, याच्याशी आमचे काही देणेघेणे नाही. त्यांच्या प्रतिक्रियांवर आम्ही काहीही बोलत नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

‘माझ्या भावासोबतचं नातं कायम राहील’

अजित पवार यांच्यासोबतच्या नात्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे भावुक झाल्या. माझे आणि माझ्या भावाचे नाते जवळचे होते. आमच्यातील तो ओलावा कायम राहील, असे त्या म्हणाल्या. आमच्या नेत्यांमध्ये अशा प्रकारच्या चर्चा होत असतील, तर त्यात चुकीचे काय आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दादा गेल्यानंतर विलीनीकरणाचा विषय आमच्या मनातही राहिलेला नाही. आमच्यासाठी तो विषय तिथेच संपला आहे, असे सांगत त्यांनी या चर्चांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा पूर्णविराम?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 12 फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले असते, असा दावा केला होता. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले होते. दोन्ही पक्षांचे नेते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत होते.

मात्र, सुप्रिया सुळे यांच्या ताज्या विधानामुळे शरद पवार गटाची भूमिका स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, याबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांच्या विधानामुळे नवे वळण मिळाले आहे. तसेच सत्तेत सहभागी होण्याऐवजी लोकशाहीवर आमचा विश्वास असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.

Supriya Sule spoke quite candidly, saying, “I’m fed up now!”

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात