ममता बॅनर्जी – भूपेंद्र पटेल; एकीकडे राजकीय गाजावाजा; दुसरीकडे आर्थिक गुंतवणुकीला हवा!!


नाशिक : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येऊन गेल्या. त्याचा प्रचंड गाजावाजा झाला. त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएचे अस्तित्व पुसून टाकले. Mamata v/s Bhupend patel Mumbai tour; one of politics and other for economy

या दौऱ्याची देशभर चर्चा असतानाच आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मुंबई दौऱ्यावर आले आहेत. हॉटेल ताज पॅलेस मध्ये त्यांनी टाटा सन्सचे चेअरमन व्ही. चंद्रशेखर यांची भेट घेतली आहे. मुंबईतल्या उद्योग जगतातील टॉप बॉसेस बरोबर त्यांची बैठक होत आहे. महत्त्वाचे म्हणजे व्हायब्रंट गुजरात 2022 समिटसाठी उद्योगपतींना आमंत्रण देण्यासाठी ते आले आहेत. व्हायब्रंट गुजरात 2022 समिटमध्ये पीएम गतिशक्ती योजनेला बळ देण्याचा प्रयत्न असून ऊर्जा पुनर्निर्मिती, पुनर्निर्मित ऊर्जेचा वापर, इलेक्ट्रिक मोबिलिटी, सौरऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा आग्रह आहे.



गुजरात मध्ये कोविड नंतर वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये देखील गुंतवणुकीची त्यांना अपेक्षा आहे. त्यादृष्टीने मुंबईतल्या उद्योग जगतातल्या बॉसेस बरोबर त्यांची चर्चा आहे. व्हायब्रंट गुजरात 2022 रोड शोमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे सहभागी झाले आहेत. आजच्या त्यांच्या बैठकीला टाटा, महिंद्रा, अंबानी, अदानी या विविध उद्योगसमूहांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होत आहेत.

ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा त्यांची राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाकांक्षेची पायाभरणी करणारा होता, तर भूपेंद्र पटेल यांचा मुंबई दौरा गुजरात मध्ये आर्थिक गुंतवणुकीला हवा देणारा ठरतो आहे. मराठी माध्यमांनी ममता बॅनर्जी यांचा राजकीय दौरा बराच बराच उचलून धरला. परंतु भूपेंद्र पटेल यांच्या दौऱ्याकडे मात्र त्यांचे पुरेसे लक्ष गेलेले नाही. एकीकडे नुसताच राजकीय गाजावाजा झालाय पण दुसरीकडे आर्थिक गुंतवणुकीला हवा मिळते आहे. याकडे मराठी माध्यमांचे दुर्लक्ष झाले आहे.

Mamata v/s Bhupend patel Mumbai tour; one of politics and other for economy

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात